पुणे : आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) स्टार संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हॅट्ट्रिक साधली. ही हॅट्ट्रिक पराभवाची (Defeat) असल्याने फॅन्सच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. बुधवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सने (Pat Cummins) मुंबईचा विजयी घास हिरावून घेतला. पॅट कमिन्सने 15 चेंडूत 56 धावा ठोकून 16 व्या षटकात मुंबईचे 170 धावांचे आव्हान पार केले. दरम्यान, या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) तसेच मुंबई इंडियन्सवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट (Emotional Post) लिहिली.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 14 सामने झाले आहेत. सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराईजर्स हैदराबाद खाते उघडलेले नाही. मुंबई आणि चेन्नई हे आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. सध्या ते आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. मुंबईला आयपीएलच्या प्रत्येक हंगामात लयीत येण्यास थोडा कालावधी लागतो. यंदाही त्यांनी आपली ही परंपरा कायम ठेवली. याच बाबत कर्णधार रोहित शर्माने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली. तो आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, 'आम्ही चांगल्या आणि वाईट परिस्थितीत कायम एकत्र असतो ती आमची एक ताकद आहे. तुम्हाला अजून काही पाहिलेलं नाही.'
रोहितला या पोस्टद्वारे मुंबई इंडियन्सचे चाहते चांगल्या वाईट परिस्थिती कायम संघासोबत असतात. ही मुंबई इंडियन्सची तादक आहे. अजून स्पर्धेत बरच काही होणार आहे असे म्हणायचे आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर बेंगलोर सोबत होणार आहे. हा सामना देखील पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.