Rohit Sharma : 'आता याचा गांभीर्याने...' मुंबई इंडियन्सच्या विजयानंतरही रोहित या गोष्टीवर संतापला!

वानखेडेवरील पराभवाचा घेतला बदला! पण रोहित शर्मा गोष्टीवर संतापला
mumbai indians captain rohit sharma
mumbai indians captain rohit sharma
Updated on

Rohit Sharma IPL 2023 : आयपीएल 2023चा 46 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने पंजाबचा 6 गडी राखून पराभव करत, वानखेडेवरील पराभवाचा बदला घेतला.

या हंगामात खराब सुरुवातीनंतरही मुंबई संघाने दमदार पुनरागमन करत 9 सामन्यांत 5 विजय नोंदवले आहेत. या सामन्यातील विजयानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या फलंदाजांचे कौतुक केले. पण रोहित शर्मा गोलंदाजांवर संतापला.

mumbai indians captain rohit sharma
IPL 2023: एका पराभव अन् दोन्ही संघांच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात! हैदराबाद-कोलकता आज लढत

रोहित सामन्यानंतर म्हणाला की, जेव्हा आम्ही टी-20 क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा 140-150 हा विजयाचा स्कोअर होता, पण आता बघा. तसेच एका अतिरिक्त फलंदाजानेही खूप फरक पडत आहे. मी पाहिलं की या आयपीएलमध्ये सरासरी स्कोअर 180 आहे.

सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनच्या फलंदाजीबद्दल तो म्हणाला की, सूर्या आणि किशनने चांगली फलंदाजी केली, तर टिम आणि टिळक यांनी फिनिशरची भूमिका बजावली. असे आम्ही मोसमापूर्वी ठरवले होते. निकालाची चिंता करणार नाही कारण असे केल्याने रणनीती अंमलात आणता येणार नाही.

mumbai indians captain rohit sharma
Wrestlers Protest: जंतर मंतरवर 'मिड नाइट ड्रामा'; कुस्तीपटूंचा पोलिसांवर गंभीर आरोप, कुस्तीपटू विनेश फोगट रडली

रोहित शर्माने 41 चेंडूत 75 धावा करणाऱ्या ईशान किशनचे कौतुक करताना म्हणाला की, तो उंचीने लहान आहे पण त्याच्यात ताकद खूप आहे. आज त्याने जे शॉट्स खेळले, त्याचा तो रोज सराव करतो.

मुंबईविरुद्धची ही सलग चौथी 200 पेक्षा जास्त धावसंख्या होती आणि रोहितने कबूल केले की त्यावर काम करणे आवश्यक आहे. तो म्हणाला की, मधल्या षटकांमध्ये आम्हाला धावा रोखायच्या आहेत. आम्ही तीन-चार सामन्यांत 200 हून अधिक धावा दिल्या आणि आता याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 3 गडी गमावून 214 धावा केल्या. यादरम्यान लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी शानदार खेळी केली. मुंबईसमोर 215 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. दुसऱ्या डावात मुंबईने 18.5 षटकांत 4 गडी गमावून या लक्ष्याचा पाठलाग केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.