IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पोलार्डसह 'या' खेळाडूवरही BCCI ने घेतली ॲक्शन; ड्रेसिंग रुममधून खाणाखुणा करणं आलं अंगलट

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्डसह खेळाडू टीम डेविड यांच्यावर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.
Mumbai Indians | Kieron Pollard | Tim David
Mumbai Indians | Kieron Pollard | Tim DavidSakal
Updated on

Mumbai Indians News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 33 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला होता. मुल्लनपूरमध्ये झालेल्या या सामन्यात मुंबईने 9 धावांनी विजय मिळवला.

मात्र असे असले तरी या सामन्यादरम्यान नियमांचा भंग केल्याच्या कारणाने मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड आणि फलंदाज टीम डेविड यांच्यावर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

त्यांनी आयपीएलच्या आचारसंहितेतील कलम 2.20 च्या नियमाचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. या नियमाच्या अंतर्गत लेव्हल-1 ची चूक त्यांच्याकडून झाली असल्याचे सांगण्यात आले असून त्यांच्यावर सामनाशुल्काच्या 20 टक्के दंड आकारण्यात आला आहे.

Mumbai Indians | Kieron Pollard | Tim David
MS Dhoni: धोनी वरच्या क्रमांकावर का करत नाही फलंदाजी? अखेर कोच फ्लेमिंगनेच उघडलं मोठं रहस्य

पोलार्ड आणि डेविड यांनी त्यांची चूक मान्य केली असून कारवाईही मान्य केली आहे. लेव्हल-1 च्या चूकीसाठी सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असतो.

दरम्यान, बीसीसीआयने त्यांच्यावरील कारवाईचे कारण स्पष्ट केलेलं नाही. मात्र त्यांनी संघाच्या डगआऊटमधून डीआरएस रिव्ह्युबाबत केलेल्या खाणाखुणांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा कयास अनेकांनी वर्तवला आहे.

ही घटना मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजी करत असताना 15 व्या षटकात घडली. या षटकात पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता. तसेच सूर्यकुमार यादव फलंदाजी करत होता. अर्शदीपने या षटकाच्या शेवटचा चेंडू वाईड यॉर्कर टाकला. पण यावर पंचांनी वाईड दिला नव्हता.

Mumbai Indians | Kieron Pollard | Tim David
MS Dhoni: धोनीने वानखेडेवर ज्या मुलीला दिलेला बॉल गिफ्ट, ती लकी गर्ल आहे तरी कोण अन् काय म्हणाली? पाहा Video

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यावेळी जेव्हा कॅमेरा मुंबईच्या डगआऊटकडे वळवण्यात आला, तेव्हा दिसले की मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर सूर्यकुमारला हा चेंडू वाईड असल्याचे सांगताना दिसले, तसेच टीम डेविड आणि पोलार्ड हे रिव्ह्यु घेण्याचा इशारा करताना दिसले होते.

यादरम्यान, सूर्यकुमारने रिव्ह्यूची मागणी केली होती. रिव्ह्यूमध्ये चेंडू वाईड असल्याचे दिसले आणि हा चेंडू वाईड देण्यात आला. त्यानंतरच्या चेंडूवर सुर्यकुमारने चौकार मारला.या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

नियमानुसार खेळपट्टीवर असलेले फलंदाज रिव्ह्यु घेताना एकमेकांशी चर्चा करू शकतात, पण त्यांना इतर कोणाची याबाबत मदत घेता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.