Mumbai Indians : या ३ कारणांमुळे IPL प्ले ऑफमधून बाहेर

आयपीएल 2022 मधील खराब कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला लाज वाटण्याची काही कारणे
Mumbai Indians Out Of Race for Playoffs
Mumbai Indians Out Of Race for Playoffs
Updated on

Mumbai Indian out From IPL 2022 Playoffs: 5 वेळा चँपियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) अवस्था बिकट होत चाले आहे. मुंबईला लीगच्या 37 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 36 धावांनी पराभव पत्करावा लागला. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने सलग आठ पराभव आहे. आता मुंबई आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. लीगच्या इतिहासात ही सहावी वेळ आहे की मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही. यापूर्वी 2008, 2009, 2016, 2018 आणि 2021 मध्ये ती प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही. आयपीएल 2022 मधील मुंबईच्या खराब कामगिरीची काही कारणे पाहुयात.(Mumbai Indians Out Of Race for Playoffs)

आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची सलामीची जोडी आतापर्यंत काही मोठी कामगिरी करू शकलेली नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामीची जोडी आतापर्यंत मोठी भागीदारी करू शकलेली नाही. पहिल्या आठ सामन्यात रोहितने 153 तर इशानने 199 धावा केल्या आहे. संघाला ठोस सुरुवात न मिळाल्याने पुढे येणाऱ्या फलंदाजांवर दबाव वाढत असून ते दबावाखाली विकेटही देत आहे. लागोपाठ आठ सामने गमावल्यानंतर कर्णधार रोहितनेही कोणतीही फलंदाज जबाबदारी घेण्यास तयार नसल्याची कबुली दिली.

Mumbai Indians Out Of Race for Playoffs
IPL SRH: काव्या मारन गदगदली, डान्सचा व्हिडिओ व्हायरल

आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्सची गोलंदाजी ज्याचा संघ ओळखत आहे. या हंगामात तो धारदारपणा दाखवत आला नाही. 200 धावा केल्यानंतरही गोलंदाजांना त्याचा बचाव करता येत नाही. मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इतर कोणत्याही गोलंदाजांची साथ मिळत नाही. संघाला ट्रेंट बोल्टची उणीव जाणवत आहे. जो सुरुवातीला नवीन चेंडूवर विकेट मिळवायचा. टायमल मिल्स, जयदेव उनाडकट आणि बेसिल थम्पीसारखे गोलंदाज खूप धावा देत आहे.

Mumbai Indians Out Of Race for Playoffs
IPL 2022: चेन्नईला लय सापडणार का? वानखेडे स्टेडियमवर पंजाबशी लढत

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्या अनुपस्थितीत संघाला अष्टपैलू खेळाडूंची कमतरता भासत आहे. किरॉन पोलार्ड देखील एकटा काही विशेष करू शकत नाही. तो चेंडू आणि बॅटने आपली छाप सोडू शकत नाही. हार्दिक पांड्या आणि कृणाल इतर संघात गेल्यामुळे मुंबई इंडियन्सला त्यांचा पर्याय शोधता आलेला नाही. खालच्या फळीतील संघासाठी कोणताही फलंदाज स्फोटक खेळी खेळू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.