Mumbai Indians Video: इंडियन प्रिमीयर लीगच्या १७ व्या हंगामात २३ सामने खेळून पूर्ण झाले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला, परंतु दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संघाने जोरदार कमबॅक करत विजय मिळवला.
आता संघ आपला पुढचा सामना राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोरविरुद्ध खेळणार आहे. त्यापूर्वी मुंबई संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन आणि पियुष चावला या त्रिकुटाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सच्या ट्विटर आकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा, इशान किशन आणि पियुष चावला हे कार रेसिंगचा आनंद घेताना दिसत आहेत, तसेच ते मजेशीर गप्पा मारताना दिसत आहेत.
त्या तिघांमध्ये रिमोट कारच्या रेसिंगची स्पर्धा सुरु आहे. रोहित शर्माची कार सतत रस्ते बदलताना दिसत आहे, तर पियुष चावलाची कार उलट्या दिशेला जाताना दिसत आहे.
एमआयने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शमध्ये लिहिले आहे की, 'ये तो स्लो हे यार'. तसेच ही कार रेस कुमकुमवतांसाठी नाही असही कॅप्शनमध्ये मुंबईने दिल आहे. चाहते याच्यावर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
मुंबई संघाला सुरुवातीच्या ३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यानंतरच्या सामन्यात संघाने पुनरागमन करत दिल्लीला २९ धावांनी पराभूत केले. मुंबई आपला पुढचा सामना ११ एप्रिलला आरसीबीविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. सध्या मुंबई एका विजयासह गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे.
मुंबईने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आपला आयपीएल इतिहासातील १५० वा विजय मिळवला आहे. मुंबईने आत्तापर्यंत २७३ सामने खेळले आहेत, त्यापैकी १५० सामन्यात संघाला यश आले आहे तर ११७ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या यादीत दूसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स आहे. चेन्नई आत्तापर्यंत १४८ सामने जिंकले आहेत. तसेच मुंबईचा वानखेडे स्टेडियमवरील हा ५० वा विजय होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.