PBKS vs MI : पंजाबनं पाचवेळच्या विजेत्यांचे ठोके वाढवले; अखेर बुमराहच्या पुण्याईवर हार्दिकचा संघ जिंकला

Jasprit Bumrah
Mumbai Indians Defeat Punjab Kings In Last Over Thriller IPL 2024 esakal
Updated on

Mumbai Indians Defeat Punjab Kings In Last Over Thriller IPL 2024 : पंजाबची पॉवर प्लेमध्येच अवस्था 5 बाद 49 धावा अशी झालेली होती. पंजाबला विजयासाठी 77 चेंडूत 144 धावा करायच्या होत्या. मुंबईनं हा सामना आरामात खिशात टाकला असंच सर्वांना वाटलं होतं.

मात्र पंजाबचे दोन जय अन् विरू ये दोस्ती हंम नही तोडेंगे म्हणत नुसता धुमाकूळ घातला. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा असं या जय-विरू जोडीचं नाव! संघातील इतर नाव मोठं लक्षण खोटं म्हण खरी करणारी इंटरनॅशनल प्लेअर संघाला अडचणीत आणत होती. त्यावेळी ही भारतीय अनकॅप जोडी संघासाठी उभी राहतेय.

या जोडीनं संघाच्या मदतीला धावून जाण्यात सातत्य राखलंय. त्यांनी मुंबईविरूद्धही पंजाबला 5 बाद 49 धावांवरून जिंकण्याचा स्थितीत आणून ठेवलं. मुंबईचं नशीब चांगलं की त्यांनी ठराविक अंतरांनी विकेट्स घेतल्या अन् सामना कसाबसा आपल्या नियंत्रणात ठेवला.

Jasprit Bumrah
PBKS vs MI : अखेर मुंबईनं सामना जिंकला; आशुतोष अन् शशांकची झुंज व्यर्थ

मुंबई इंडियन्सच्या 193 धावांचा पाठलाग करत असताना पंजाबची पहिल्या दहा षटकात अवस्था 6 बाद 77 धावा अशी झाली होती. पंजाबचा किल्ला लढवण्यासाठी शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा ही जोडी मैदानात होती. या जोडीनं मुंबईच्या तगड्या गोलंदाजीला अजीबात डोक्यावर घेतलं नाही. उलट या जोडीनं आपल्या आक्रमक स्वॅग कायम राखत मुंबईचा सामन्यावर आपलाच कब्जा असल्याचा भ्रम तोडला.

या जोडीनं पंजाबला शतक पार पोहचवलं. तेवढ्यात जसप्रीत बुमराहनं 25 चेंडूत 41 धावा करून पंजाबला पुन्हा विजयाची आशा दाखवणाऱ्या शशांक सिंहला बाद करून मुंबईला मोठा दिलासा दिला.

मात्र हा दिलासा काही क्षणच टिकला कारण आशुतोष शर्मानं आपला दांडपट्टा सुरू केला होता. त्यानं 28 चेंडूत 61 धावा ठोकत मुंबईला तुम्ही 15 ते 20 धावा कमीच केल्यात याची जाणीव करून दिली. हा पठ्ठ्या मॅच काढून देणार असं वाटत असतानाच कॉट्झीनं त्याची झुंज संपवली.

18 व्या षटकात पंजाबला आठवा धक्का बसला होता. मुंबई आता विजयासाठी फक्त 2 विकेट्स दूर होती. 19 व्या षटकात हार्दिक पांड्यानं 20 चेंडूत 21 धावा करणाऱ्या हरप्रीत ब्रारला बाद करत पंजाबचा जवळपास कडेलोटच केला होता.

मात्र रबाडानं पांड्याला काही हिरो होऊ दिलं नाही. त्यानं पांड्याची शेवटच्या दोन चेंडूतच इकॉनॉमी बिघडवली. त्यानं आल्या आल्या पांड्याला षटकार मारला अन् सामना 6 चेंडूत 12 धावा असा आणला.

रबाडानं मारल्या षटकारानं मुंबईच्या काळजात धस्स झालं होतं. मात्र शेवटच्या षटकात मोहम्मद नबीच्या थ्रोवर इशान किशननं रबाडाला धावबाद केलं अन् पंजाबची फडफड अखेर संपवली. मुंबईनं सामना जिंकला असला तरी त्यांना फलंदाजीत थोडं कमी पडलो याची जाणीव पंजाबनं नक्कीच करून दिली.

Jasprit Bumrah
Sam Curran Toss PBKS vs MI : काय भरोसा खात्री केलेली बरी... सॅम करनच्या कृतीनं मुंबई इंडियन्सभोवती वाढले संशयाचे ढग?

मुंबईच्या फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर जशी सुरूवात मुंबई करते तशीच सुरूवात मुंबईनं केली होती. पॉवर प्लेमध्ये रोहितने तडाखे दिले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं आपल्याला उगाचच टी 20 चा बादशाह म्हणत नाहीत हे दाखवून दिलं.

तिलक वर्मानं देखील 18 चेंडूत 34 धावा करत आपणच मुंबईचं पुढचं भविष्य आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. या तिघांनी मिळून मुंबईला 16 व्या षटकात जवळपास 150 च्या घरात पोहचवलं.

मात्र त्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी माती खाल्ली. हार्दिक पांड्या नेहमीप्रमाणे स्वस्तात माघारी गेला. टीम डेव्हिडनं 7 चेंडूत 14 धावा ठोकून मुंबईला 200 धावांच्या पार पोहचवण्याचा इरादा दाखवला. मात्र शेवटच्या षटकात हर्षल पटेलनं डेव्हिड, शेफर्ड या हार्ड हिटर फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

यंदाच्या हंगामात स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट हर्षल पटेल चमकलाच नव्हता. तो मुंबईविरूद्ध चमकला शेवटच्या षटकात त्यानं 3 धावात दोन विकेट्स घेतल्या. अन् मुंबईला जवळपास 15 ते 20 धावा कमी पडल्या. मात्र पुढं बुमराह आणि कॉट्झी यांनी पॉवर प्लेमध्ये केलेल्या पुण्याईवर मुंबईनं सामना जिंकला अन् पॉईंट टेबलमध्ये नवव्या स्थानावरून सातव्या स्थानावर झेप घेतली.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.