Mumbai Indians : पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये झालं तरी काय? व्हिडिओ होतोय व्हायरल

Mumbai Indians Dressing Room Video : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना अखेर जिंकला आहे.
Rohit Sharma Mumbai Indians
Mumbai Indians dressing room video Rohit Sharma News Marathisakal
Updated on

Mumbai Indians Dressing Room Video : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना अखेर जिंकला आहे. सलग तीन पराभवानंतर हा विजय मिळाला आहे, त्यामुळे तो आणखी महत्त्वाचा आहे. मुंबईला त्यांच्या घरच्या म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, पण आता घरच्या मैदानावर संघाने सामना जिंकला आहे.

Rohit Sharma Mumbai Indians
IPL 2024 Delhi Capitals : चार पराभवानंतर दिल्ली संघाने घेतला मोठा निर्णय! 'या' खेळाडूची वाइल्ड कार्ड एन्ट्री

रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 27 चेंडूंत 49 धावांची खेळी खेळली आणि यादरम्यान त्याने सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही खेळाडूने 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या नाहीत, परंतु तरीही संघाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 234 धावा केल्या.

Rohit Sharma Mumbai Indians
IPL 2024 Delhi Capitals : चार पराभवानंतर दिल्ली संघाने घेतला मोठा निर्णय! 'या' खेळाडूची वाइल्ड कार्ड एन्ट्री

रोहित आणि इशान किशन यांनी मिळून 7 षटकांत 80 धावा जोडल्या आणि त्यानंतर टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी मिळून अखेरच्या षटकांमध्ये संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. इशान 42 धावा करून बाद झाला. टीम डेव्हिडने नाबाद 42 आणि रोमारियो शेफर्डने 10 चेंडूत 39 धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला.

दरम्यान पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा फलंदाजी कोच किरॉन पोलार्ड रोहित शर्माला सामनावीर पुरस्कार देत आहे.

Rohit Sharma Mumbai Indians
T20 World Cup : T-20 वर्ल्ड कपमध्ये पंत-सूर्याच्या खेळण्यावर टांगती तलवार... 'या' खेळाडूमुळे होणार पत्ता कट?

पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, 'मला वाटते की आपल्या संघाकडून ही उत्कृष्ट फलंदाजी होती. पहिल्या सामन्यापासूनच हे हवे होते. एक खेळाडूने नाही तर संपूर्ण फलंदाजी युनिटने जबाबदारी घेतली तर कामगिरीत फरक पडतो हे यावरून दिसून येते. आपण बर्याच काळापासून या गोष्टीबद्दल बोलत आहोत आणि फलंदाजी प्रशिक्षक मार्क बाउचर आणि कर्णधाराला हेच हवे आहे. हे पाहणे खूप छान होते आणि ते असेच चालू राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.