MI vs LSG Eliminator : ...हा संघ खेळणार क्वालिफाय 2! दिग्गज एबी डिव्हिलयर्सने केली मोठी भविष्यवाणी

MI vs LSG Eliminator
MI vs LSG Eliminator esakal
Updated on

MI vs LSG Eliminator : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमनेटर सामन्यात कोण विजेता होणार हे सांगितले. मुंबई आणि लखनौ आज चेन्नईत एलिमनेटर सामना खेळणार आहे. या सामन्यात मुंबईला जिंकण्याची अधिक संधी असल्याचे मत डिव्हिलियर्सने व्यक्त केले.

लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा तर मुंबईने सनराईजर्स हैदराबादचा पराभव करत आपले प्ले ऑफचे तिकीट नक्की केले. आज हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरचे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार असून. या सामन्यातील विजेता अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्ससोबत क्वालिफायर 2 सामना खेळेल.

MI vs LSG Eliminator
WTC Final 2023 : RCB च्या पराभवाचं दुःख बाजूला सारून विराट लागला पुढच्या मिशनला, सिराजही...

दरम्यान, आजच्या सामन्यात विजयाची कोणाला संधी आहे याबाबत एबी डिव्हिलियर्सने ट्विट केले. 'द एलिमनेटर! लखनौ विरूद्ध मुंबई. गुजरातसोबत क्वालिफाय 2 कोण खेळणार. मला असे वाटते की मुंबई इंडियन्सला त्यांचा मोठ्या सामन्यासाठीचा अनुभव पाहता जास्त संधी आहे. ते यापूर्वीही प्ले ऑफ खेळले आहेत. चेपॉक स्टेडियमचे सिक्रेट काय आहे. अनेक संघ इथे काय चुका करतात?'

MI vs LSG Eliminator
Video : मॅच जिंकल्याच्या आनंदात लेकीची धोनीला मिठी! शेलारांशी देखील केला शेकहँड

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, 'तुमची सुरूवात चांगली होऊ दे नाही तर खराब प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. ही छोटी गोष्ट आहे इथं तुम्हाला मोठे षटकार सामना जिंकून देणार नाही. दमदार सामन्यासाठी तयार रहा. जो कोणी इथे जिंकून जाणार तो गुजरातविरूद्ध चांगला आत्मविश्वास घेऊन जाणार. चेन्नई विरूद्धच्या पराभवानंतर गुजरातचे मनोबल थोडे खालावले असेल.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()