मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाच्या हंगामात अत्यंत खराब कामगिरी करत आहे. मुंबईने यंदाच्या हंगामात सलग आठ सामने हारले आहे. मुंबईच्या गोलंदाजीत खूप ढिसाळ कामगिरी सुरू आहे. दरम्यान मुंबईने आता एका अनुभवी वेगवान गोलंदाजाला (Fast Bowler) थेट कॉमेंटरी बॉक्समधूनच (Commentary Box) पाचारण करण्याचे ठरवले आहे. तर हा अनुभवी गोलंदाज सरावात चांगल्या लयीत दिसला तर त्याला उर्वरित हंगामातील सामन्यात खेळवण्यात येईल.
या अनुभवी वेगावान गोलंदाजाचे नाव आहे धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni). 33 वर्षाच्या हा वेगावान गोलंदाज मुंबईच्या बायो बबलमध्ये दाखल झाला असून तो लवकरच सरावाला सुरूवात करणार आहे. धवल कुलकर्णी सध्या समालोचन करत होता. मात्र मुंबईने त्याच्याशी संपर्क साधला. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आठ सामन्यात तब्बल 229 धावा दिल्या आहेत. त्याला आतापर्यंतच्या आठ सामन्यात 5 विकेट घेणेच जमले. याचबरोबर जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) पाच सामन्यात 190 धावा देत सहा विकेट घेतल्या. तर डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) पाच सामन्यात 209 धावा देत 6 विकेट घेतल्या आहेत. मुंबईच्या गोलंदाजांची ही सर्वसाधारण कामगिरीच संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरत आहे.
दरम्यान, मुंबईने सामील करून घेतलेल्या धवल कुलकर्णी मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळतो. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा देखील अनुभव आहे. त्याने आतापर्यंत 92 आयपीएल सामने खेळले असून त्याने 86 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2008 मध्ये आयपीएल पदार्पण केले होते. कुलकर्णीने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने हे राजस्थान रॉयल्स कडून खेळले आहेत. याचबरोबर तो मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्याकडूनही खेळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.