डेव्हिडच्या झंझावाती खेळीनंतरही मुंबईचा पराभव; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मुंबई इंडियन्सच्या आशा टीम डेव्हिडने अवघ्या 17 चेंडूत 46 धावा करून उंचावल्या पण...
Mumbai Indians lost the match but found Tim David Heartbroken fans
Mumbai Indians lost the match but found Tim David Heartbroken fans
Updated on

MI vs SRH IPL 2022 : आयपीएलमध्ये 65 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अतिशय रोमांचक असा खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.(Mumbai Indians lost the match but found Tim David Heartbroken fans)

Mumbai Indians lost the match but found Tim David Heartbroken fans
MI vs SRH : झुंजार मुंबईला उमरान मलिक भिडला

राहुल त्रिपाठी, प्रियम गर्ग आणि निकोलस पूरन यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबईने धावांच्या डोंगराळ लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनने ज्याची जबाबदारी चोख पार पाडली.

रोहित-ईशान जोडीने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. पण रोहित 11व्या षटकात 48 वर बाद झाला आणि पुढच्याच षटकात ईशान किशन 43 वर पॅव्हेलियनमध्ये परतला.

Mumbai Indians lost the match but found Tim David Heartbroken fans
कोलकताला मोठा विजय आवश्यक, दोन पराभवांमुळे लखनौचाही कस लागणार

ईशान किशनची विकेट पडल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. अशा परिस्थितीत विजयापासून दूर जात मुंबई इंडियन्सच्या आशा टीम डेव्हिडने अवघ्या 17 चेंडूत 46 धावा करून उंचावल्या. पण अखेरीस मुंबईचा 3 धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्सच्या टीम डेव्हिडने तुफानी खेळी करत सामन्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सामना संपवता आला नाही. त्याच्या या धाकड फलंदाजीवर ट्विटरवर जबरदस्त प्रतिक्रिया येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.