Jofra Archer IPL Contract : गरज असताना आर्चर मुंबईला सोडून गेला, तरी फ्रेंचायजीने ठेवली वार्षिक कराराची मोठी ऑफर

Jofra Archer IPL Contract
Jofra Archer IPL Contractesakal
Updated on

Jofra Archer IPL Contract : मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर बेंगलोगचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थान झेप घेतली. हंगामात अडखळत्या सुरूवातीनंतर मुंबईने जोरदार मुसंडी मारत प्ले ऑफसाठी आपला दावेदारी सादर केली आहे. मात्र आता लीग स्टेजच्या शेवटच्या आणि महत्वपूर्ण टप्प्यात मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर मुंबईला सोडून मायदेशात परतला आहे.

जोफ्रा आर्चर हंगामातील पहिले काही सामने दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र त्यानंतर तो मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि तो सामन्यात गोलंदाजी देखील करू लागला. परंतु इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जोफ्रा आर्चरला अॅशेस मालिका आणि वर्ल्डकप 2023 च्या पार्श्वभुमीवर आपल्या दुखापतीवर पूर्णपणे मात करण्यासाठी मायदेशात बोलावून घेतले. यामुळे मुंबई इंडियन्स चांगलीच वैतागली असून 2022 च्या लिलावात 8 कोटी रूपयांना खरेदी केलेल्या जोफ्रा आर्चरला आता वार्षिक करार ऑफर केला आहे.

Jofra Archer IPL Contract
MS Dhoni Retirement : धोनीचे निवृत्तीबाबत घुमजाव! कॅप्टनची झाली अडचण, आता 2025 चा मेगा लिलाव...

डेली मेलच्याने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला वार्षिक कराराची ऑफर दिली आहे. याद्वारे मुंबई जोफ्रा आर्चरला आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच या करारामुळे जोफ्रा आर्चरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सचे ना हरकर प्रमाणपत्र लागणार आहे. जोफ्रा आर्चर गेल्या तीन वर्षापासून कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. तरी देखील मुंबईने आर्चरला 2021 आणि 22 मध्ये त्याच्याशी 8 कोटी रूपयाचा करार केला. मात्र इसीबीने त्याला परत बोलवून घेतल्याने मुंबई इंडियन्स निराश झाली आहे.

मुंबई इंडियन्सची आयपीएलबरोबरच युएईमधील इंटरनॅशनल लीग आणि दक्षिण आफ्रिका लीगमध्ये देखील टीम आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स जोफ्रा आर्चरला आपल्यासोबत वर्षभर ठेऊ इच्छिते. आर्चर हा सध्या इसीबीच्या क्रेंद्रीय करारातील खेळाडू आहे. त्यामुळे तो मुंबई इंडियन्ससोबत असा करार करू शकत नाही. जर जोफ्रा आर्चर असा करार करतो तर त्याला इसीबीच्या करारावर पाणी सोडावे लागले.

Jofra Archer IPL Contract
MS Dhoni CSK : मला जास्त धावायला लावायचं नाही... धोनीने संघ सहकाऱ्यांना केलीये सक्त ताकीद

आयपीएल फ्रेंचायजींनी युएई, कॅरेबियन लीग आणि दक्षिण आफ्रिका लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत. त्यामुळे ते आता आपल्या संघातील खेळाडूंवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू इच्छितात. ते त्यांना वार्षिक करार ऑफर करत आहेत. याद्वारे खेळाडू या फ्रेंचायजीकडून अनेक लीग खेळू शकतील.

याबाबत बोलताना एका फ्रेंचायजीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'हा खूप पुढचा निर्णय आहे. मात्र होय अशा प्रकारच्या कल्पनेवर विचार सुरू आहे. ही कल्पना सत्यात लवकरच उतरणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असा करार करू इच्छित नाहीत. मात्र ते निवृत्त झाले आहेत. त्यांना या करारामुळे आर्थिक आणि खेळण्याची सुरक्षा प्राप्त होईल. या गोष्टीचा अनेक फ्रेंचायजी नक्कीच विचार करतील.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.