IPL 2023: RCBच्या पराभवाने प्लेऑफचे चित्र स्पष्ट! जाणून घ्या कोण येणार प्लेऑफमध्ये आमनेसामने

IPL 2023 Playoffs Scenario
IPL 2023 Playoffs Scenariosakal
Updated on

IPL 2023 : आयपीएल 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध हारल्यानंतर RCB ची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी हुकली आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला आता प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाला आहे. मुंबई संघाने 16 हंगामांपैकी 10व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यासोबतच गुणतालिकेतील टॉप-4 स्थानही पक्के झाले आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला.

IPL 2023 Playoffs Scenario
IPL 2023: विराट-RCBचा प्रवास संपला अन् नवीन उल हकने उडवली खिल्ली; सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

गुजरात टायटन्सचा संघ 20 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंट्सही तेवढ्याच गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून आणि आरसीबीच्या पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहोचलेली मुंबई इंडियन्स 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. CSK आता क्वालिफायर 1 मध्ये गुजरातशी भिडणार तर एलिमिनेटरमध्ये लखनऊची मुंबईशी टक्कर होणार आहे.

IPL 2023 Playoffs Scenario
Shubman Gill RCB vs GT : शुभमनलाच मुंबईचा कळवळा! शतक ठोकत मुंबईला पोहचवले प्ले ऑफमध्ये

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे आरसीबीने पहिल्या खेळात 197 धावा केल्या होत्या. 198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात काही खास झाली नाही. ऋद्धिमान साहा 12 धावा करून बाद झाला. यानंतर विजय शंकर (35 चेंडूत 53) आणि शुभमन गिल (52 चेंडूत नाबाद 104 धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केला. शेवटपर्यंत शुभमन एका टोकाला उभा राहिला आणि त्याने आपल्या संघाला 19.1 षटकांत 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला.

IPL 2023 Playoffs Scenario
Virat Kohli RCB vs GT : विराट भाऊचे सलग दुसरे शतक, आरसीबी अडचणीत असताना किंग कोहली शेवटपर्यंत झुंजला

पूर्ण प्लेऑफ वेळापत्रक

  • क्वालिफायर - 1 - CSK विरुद्ध GT, चेपॉक, 23 मे 2023

  • एलिमिनेटर - LSG vs MI चेपॉक 24 मे 2023

  • क्वालिफायर 2 - एलिमिनेटर विजेता वि क्वालिफायर 1 पराभूत, अहमदाबाद, 26 मे 2023

  • अंतिम - क्वालिफायर 1 विजेता विरुद्ध क्वालिफायर 2 विजेता, अहमदाबाद, 28 मे 2023

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.