Hardik Pandya : हंगामातील खराब कामगिरीनंतर हार्दिकबाबत MI मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय? कामकाजावर सिनियर खेळाडूंचीही नाराजी

Mumbai Indians seniors question Hardik Pandya : हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेला आयपीएल संघ मुंबई इंडियन्स आता आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
Mumbai Indians seniors question Hardik Pandya
Mumbai Indians seniors question Hardik Pandyasakal
Updated on

Mumbai Indians seniors question Hardik Pandya : हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेला आयपीएल संघ मुंबई इंडियन्स आता आयपीएलमधून बाहेर पडला आहे. संघ आपले उरलेले सामने खेळणार असला तरी आता टॉप 4 म्हणजेच प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता संपली आहे.

मुंबईने इथून सगळे सामने जिंकले आणि बाकीची समीकरणे जुळवली तरी त्यानंतरही काहीही होऊ शकत नाही. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या सिनियर खेळाडूंनी कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Mumbai Indians seniors question Hardik Pandya
Mumbai Indians : मुंबईसाठी कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात हार्दिक पांड्या अपयशी! नावावर केला लज्जास्पद विक्रम

मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. पण 17 व्या हंगामात संघाची कामगिरी खुपच खराब राहिली. 2024 च्या आधी असे एकदाच घडले होते, जेव्हा आयपीएल हंगामातून मुंबईचा संघ पहिल्यांदा बाहेर गेला होता. ते वर्ष 2022 होते, यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.

Mumbai Indians seniors question Hardik Pandya
IPL 2024 Playoffs : पांड्याच्या मुंबईने पकडली घरची गाडी... आता कोणत्या संघाचा लागणार नंबर? जाणून घ्या प्लेऑफचे गणित

आता इंडियन एक्स्प्रेसमधून एक बातमी समोर आली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, एका सामन्यानंतर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह यांच्यासह संघातील सर्व खेळाडूंनी कोचिंग स्टाफची भेट घेतली, त्यानंतर काही वरिष्ठ खेळाडूंनी वेगळे बोलून संघाच्या खराब कामगिरीची कारणे सांगितली.

हंगामातील पहिल्या सामन्यांपासूनच हार्दिक पांड्याच्या अनेक निर्णयांवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात होत. कधी जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी उशीरा आणणे, कधी फलंदाजी क्रमात बदल करणे, हे अनेकदा पाहायला मिळाले.

Mumbai Indians seniors question Hardik Pandya
SRH vs LSG : तू कोणत्या ग्रहावर बॅटिंग करतोयस? युवीचा हेडला थेट सवाल, अभिषेक शर्माबाबत केलं मोठं वक्तव्य

त्यामुळे हार्दिकचे कर्णधारपदही धोक्यात आल्याचे दिसत आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, हंगाम संपल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही संघाच्या कामगिरीचे पडताळणी केल्या जाईल आणि गरज पडल्यास फ्रँचायझी संघाच्या भवितव्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. असो, या हंगामानंतर मिगा लिलाव होणार आहे. त्यामुळे कोणता मोठा निर्णय होणार हे येत्या काही महिन्यांतच स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.