LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

LSG vs MI
LSG vs MI IPL 2024 ESAKAL
Updated on

LSG vs MI IPL 2024 : बीसीसीआयनं भर दुपारी टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर संघ निवडीची चर्चा असतानाच लखनौ अन् मुंबईचा आय़पीएल सामना सुरू झाला. मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये चार वर्ल्डकप संघातील खेळाडू होते तर लखनौची पाटी कोरीच होती. लखनौची एकमेव आशा केएल राहुलला देखील कट्टा दाखवण्यात आला होता.

याचा वचपा केएलनं आधी टॉस जिंकून अन् नंतर मुंबईची स्टार टॉप ऑर्डर अवघ्या 27 धावात उडवून काढला. मुंबईचे रोहित, सूर्या, तिलक अन् हार्दिक फज्जाला पाय लावून माघारी परतले. या चौघांपैकी तीन तर भारताच्या टी20 वर्लडकप संघातील खेळाडू!

LSG vs MI
LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

बर मुंबईची अशी अवस्था झाली असताना मुंबईला सावरण्याचं काम कुणी केलं? तर निवडसमितीनं डच्चू दिलेल्या इशान किशननं! त्यानं नेहलच्या साथीनं मुंबईची लाज वाचवली. नेहलसोबत 53 धावांची महत्वाची भागीदारी रचली. या भागीदारीमुळं मुंबई कशीबशी 80 धावांपर्यंत पोहचली. त्यानंतर इशाननंही साथ सोडली. नेहलनं मुंबईला शतक पार करून दिलं.

मात्र अर्धशतकाजवळ पोहचलेल्या नेहलच्या आवाक्यात काही हाफ सेंच्युरी आली नाही. तो 46 धावा करून बाद झाला. मुंबईच्या इनिंगची शेवटची घटिका जवळ आली होती. मुंबईची मजल किती जाणार याचा घोर सर्वांना लागला होता. अखेर टीम डेव्हिड उभा राहिला अन् 18 चेंडूत नाबाद 35 धावा ठोकत संघाला 144 धावांपर्यंत पोहचवलं.

LSG vs MI
Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

मुंबईनं लखनौसमोर फायटिंग टोटल ठेवली. 145 धावा चेस करणं तसं सोपं काम नाही. त्यातच लखनौला तुषाराने अर्शिन कुलकर्णीला शुन्यावर बाद करत याची झलक दाखवली. मात्र कसलेल्या केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिसनं लखनौची अजून पडझड होऊ दिली नाही. या जोडीनं धावगती चांगली राखत 58 धावांची भागीदारी रचली.

अखेर कर्णधारानं कर्णधाराचा काटा काढला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर केएल 28 धावा करून बाद झाला. पुढं स्टॉयनिसनं डावाची सूत्रं आपल्या हातात घेतली. त्यानं दीपक हुड्डाला साथीला घेत संघाला शतकाजवळ पोहचवलं.

ही जोडी सामना जिंकून देणार असं वाटत असतानाच पांड्यानं लखनौला अजून एक धक्का दिला. 18 चेंडूत 18 धावा करणारा हुड्डा माघारी परतला. पाठोपाठ अफगाणिस्तानच्या नबीनं लखनौला तगडा झटका दिला.

45 चेंडूत 62 धावा करणाऱ्या स्टॉयनिसची शिकार करून नबीनं लखनौला चौथा धक्का दिला. 15 षटकात 115 धावांच्या जवळ पोहचलेल्या लखनौला चौथा धक्का बसला अन् त्यांची धावगती मंदावली. सामना आता बॉल टू रन आला होता.

निकोलस पूरन अन् त्याला साथ देण्यासाठी अॅश्टन टर्नर क्रिजवर होता. लखनौला 18 चेंडूत 22 धावांची गरज असताना कॉट्झीनं टर्नरला बाद करत लखनौला पाचवा धक्का दिला.

LSG vs MI
T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आयुष बदोनीने 5 चेंडूत 5 धावा करत सामना 12 चेंडूत 13 धावा असा जवळ आणला. मात्र बदोनी चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. मुंबई पुन्हा सामन्यात आली.

आता विजयासाठी 10 चेंडूत 11 धावांची गरज होती. क्रुणाल पांड्याने एक धाव घेऊन निकोलस पूरनला स्ट्राईक दिलं. पुरननंही पांड्या टाकत असलेल्या 19 व्या षटकात पाचव्या चेंडूवर चौकार वसूल करत सामना 7 चेंडूत 4 धावा असा जवळ आणला. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत पूरननं स्ट्राईक आपल्याजवळ ठेवलं.

विजयासाठी 6 चेंडूत 3 धावा हव्या असताना पूरननं कोणतीही गडबड न करता नबीच्या पहिल्याच चेंडूवर दोन धावा पळून काढल्या. त्यानंतर विजयी धाव घेत लखनौ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचवलं. लखनौच्या विजयामुळं झुंजार खेळ करूनही मुंबईचं प्ले ऑफ गाठण्याचं स्वप्न जवळपास भंगलं!

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.