रोहित शर्मा आणि ब्रेविसने 88 धावांची सलामी दिल्यानंतर लखनौने जोरदार पुनरागमन केले. कृणाल पांड्या आणि रवी बिश्नोईने सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माला बाद करत मुंबईची अवस्था 3 बाद 97 धावा अशी केली. त्यानंतर हार्दिक आणि इशान किशनने मुंबईला 13 षटकात 115 धावांपर्यंत पोहचवले.
मुंबईने देखील आक्रमक सुरूवात करत 4 षटकात 40 धावांपर्यंत मजल मारली. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना काही काळ थांबला होता. सामना पुन्हा सुरू झाल्यावर रोहितने आक्रमक फटकेबाजी सुरू केली.
लखनौचा कर्णधार केएल राहुलने 41 चेंडूत 55 धावा केल्या. तर निकोलस पूरनने आक्रमक फलंदाजी करत 29 चेंडूत 75 धावा चोपल्या. बदोनीने देखील 10 चेंडूत नाबाद 22 धावा करत लखनौला 20 षटकात 6 बाद 214 धावांपर्यंत पोहचवलं.
पियुष चावलाने मार्कस स्टॉयनिस आणि दीपक हुड्डा या दोन फलंदाजांना बाद करत लखनौची अवस्था 10 षटकात 3 बाद 69 धावा अशी केली.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना लखनौला पहिला धक्का दिला. तुषाराने देवदत्त पडिक्कलला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी डाव सावरत संघाला 4 षटकात 1 बाद 28 धावांपर्यंत पोहचवलं.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आतापर्यंत पाच सामने झाले आहेत. त्यातील फक्त 1 सामना हा मुंबईला जिंकता आला असून लखनौने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईचा लखनौविरूद्धचा एकमेव विजय हा गेल्या वर्षी चेपॉकवरील इलिमिनेटर सामन्यात मिळवला होता.
लखनौ सुपर जायंट्सने हंगामातील शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव करत शेवट गोड केला. लखनौचे 215 धावांचे आव्हान पार करताना मुंबई इंडियन्सने 6 बाद 196 धावांपर्यंत मजल मारली. मात्र लखनौच्या गोलंदाजांनी चांगला मारा करत आधी रोहितचा अन् नंतर नमनचा झंजावात रोखला. रोहितने 38 चेंडूत 68 धावा करत फलंदाजीचा चांगला सराव केला. तर नमन धीरनं 28 चेंडूत 62 धावा चोपत पुढच्या हंगामाची तजवीज करून ठेवली. लखनौकडून नवीन उल हक आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
आयपीएलच्या 67 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौने संथ सुरूवातीनंतर वेग पकडला अन् 20 षटकात 6 बाद 214 धावा ठोकल्या. लखनौकडून निकोलस पूरनने दमदार फलंदाजी करत 29 चेंडूत 75 धावांची आक्रमक खेळी केली. दुसऱ्या बाजूला केएल राहुलने 41 चेंडूत 55 धावांचे योगदान दिले. आयुष बदोनीने 10 चेंडूत 22 आणि कृणाल पांड्याने 7 चेंडूत 12 धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने चांगला मारा करत 3 विकेट्स घेतल्या. मात्र हार्दिक पांड्या, अर्जुन तेंडुलकर आणि अन्शुल काबोज यांनी धावांचा रतीब घातला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.