Dropped Catch MI vs RCB : डॉली कॅचही सोडले! जॉन्टी गेल्यापासून मुंबईची पोरं रोहितला डोकंच धरायला लावतात

Dropped Catch Rohit Sharma Reaction
Dropped Catch Rohit Sharma Reactionesakal
Updated on

Dropped Catch Rohit Sharma Reaction : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कधी नव्हे तेव्हा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न खुद्द मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनीच हाणून पाडला. यामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला डोके धरून बसण्याशिवाय कोणता पर्यायच उरला नाही.

मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करताना आरसीबीची अवस्था 2 बाद 16 धावा अशी केली होती. विराट कोहली 1 धाव करून बाद झाला होता. मात्र विराट कोहलीवर ही वेळ आलीच नसती जर बेरनडॉर्फच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात चौथ्या चेंडूवर वधेराने फाफ ड्युप्लेसिसचा सोपा झेल सोडला नसता.

Dropped Catch Rohit Sharma Reaction
MI vs RCB : मॅक्सेवेल - ड्युप्लेसिसच्या वादळाचा मुंबईला बसला तडाखा; कराव्या लागणार 10 च्या सरासरीने धावा

बेहरनडॉर्फच्या चेंडूवर फ्लिक करण्याच्या नादात फाफ ड्युप्लेसिसिने चेंडू हवेत खेळला आणि तो थेट वधेराच्या हातात गेला. मात्र वधेराला हा सोपा झेल पकडता आला नाही अन् फाफ ड्युप्लेसिसला जीवनदान मिळाले. जरी पुढच्याच चेंडूवर बेहरनडॉर्फने विराट कोहलीला 1 धावेवर बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले असले तरी ड्युप्लेसिसचा कॅच फारच महागात पडला. त्याने 41 चेंडूत 65 धावा चोपल्याच पण ग्लेन मॅक्सवेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची शतकी भागीदारी रचत आरसीबीला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिला.

Dropped Catch Rohit Sharma Reaction
Gautam Gambhir Rahul Sharma : थँक यू सासूबाई बऱ्या झाल्या.... राहुल शर्माने गौतम गंभीरचे मानले आभार

बर मुंबईचे खेळाडू इथंपर्यंतच थांबले नाहीत. सामन्याच्या 17 व्या षटकात देखील अशीच मोठी चूक केली. ड्युप्लेसिस आणि मॅक्सेवलच्या तडाख्यातून बेहरनडॉर्फने कसे बसे मुंबईला सावरले. आरसीबीचा निम्मा संघ गारद झाला होता. शेवटच्या 5 षटकात दिनेश कार्तिक आणि केदार जाधव धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात होते.

त्यातच ख्रिस जॉर्डनने आपल्या स्लोवर वनवर कार्तिकला चांगलेच गंडवले होते. चेंडू उंच हवेत उडाला. मात्र लाँग ऑनला उभ्या असलेल्या कॅमरून ग्रीनने कार्तिकचा डॉली कॅच सोडला. त्याच कार्तिकने 17 चेंडूत 30 धावा करत आरसीबीला 200 च्या जवळ पोहचवले. नाही हा झेल पकडला गेला असता तर मुंबईला मुंबईला अतिरिक्त 20 धावा कराव्या लागल्या नसत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.