IPL 2024, MI vs SRH: विंटेज पीयूष चावला, हार्दिकची भेदक गोलंदाजी अन् सूर्याचा शतकी तडाखा; मुंबईला अखेर गवसला विजय

IPL 2024, MI vs SRH: मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादला वानखेडे स्टेडियमवर पराभूत करत चौथा विजय मिळवला.
Mumbai Indians | IPL 2024
Mumbai Indians | IPL 2024Sakal
Updated on

IPL 2024, MI vs SRH: विंटेज पीयूष चावला, हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजी अन् सूर्याचा तडाखा अशा सगळ्याच गोष्टी जुळून आल्या अन् अखेर मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 17 व्या हंगामातला चौथा विजय गवसला.

सलग चार पराभव स्विकारल्यानंतर मुंबईने अखेर घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादला 7 विकेट्सने नमवण्याचा पराक्रम केला. खरंतर पहिली बॅटिंग करताना हैदाराबादचा संघ तगडा मानला जातो. याच हैदराबादच्या संघाने 27 मार्चला झालेल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 277 धावांचा डोंगर उभा केला होता.

वानखेडे स्टेडियमवर मात्र हैदराबादची फलंदाजी शांत राहिल, याची पुरेपूर काळजी मुंबईने घेतली.

Mumbai Indians | IPL 2024
Matheesha Pathirana: 'गुडबाय...!' CSK चा स्टार गोलंदाज 17 व्या IPL हंगामातून बाहेर; भावुक पोस्ट करत मानले आभार

या सामन्यात हार्दिकने टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली होती. पण हैदराबादकडून नेहमीप्रमाणे ट्रेविस हेडने आक्रमण सुरू केले, तरी त्याला पहिला सामना खेळणाऱ्या अंशुल कंभोजने आऊट करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्याला क्लिन बोल्ड केलेला बॉल नो बॉल ठरला. हेडनेही याचा फायदा घेतला आणि हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली.

मात्र जसप्रीत बुमराहने अभिषेक शर्माला बाद करत मुंबईसाठी विकेटचं खातं उघडलं आणि कंभोजनं पुनरागमन करणाऱ्या मयंक अग्रवालला माघारी धाडलं. यानंतर मात्र, पीयूष चावला आणि हार्दिक पांड्या यांच्या माऱ्यासमोर हैदराबाजचे फलंदाज फक्त हजेरी लावून गेले.

त्यातही पीयूष चावलाने हेड आणि क्लासेन या हैदराबादच्या दोन महत्त्वाच्या विकेट घेत खिंडार पाडलं. तरी शेवटी कॅप्टन कमिन्सनं झुंज देत 17 चेंडूत 35 धावा फटकावत हैदराबादला 173 धावांपर्यंत पोहचवलं.

Mumbai Indians | IPL 2024
IPL 2024: सूर्यकुमारचं रेकॉर्डब्रेक शतक, तर तिलकसह रचली विक्रमी पार्टनरशीप; MI vs SRH सामन्यातील 4 खास विक्रम

लढत देण्यासाठी 173 धावसंख्या चांगली होती. त्यातच सुरुवातीला हैदराबादच्या भूवनेश्वर आणि कमिन्सनं एक-एक ओव्हर मिडन टाकत मुंबईला टेंशन तर दिलंच पण पॉवरप्लेमध्ये इशान किशन, रोहित शर्मा अन् नमन धीर यांच्या विकेट्सही हैदराबादला मिळाल्या.

एकूणच मुंबईसाठी परिस्थिती गंभीर झाली होती, पण सूर्या दादा खंबीरपणे उभा राहिला. त्याला तिलक वर्माने एक बाजू सांभाळत साथ दिली. सूर्याने हैदराबादच्या समोर येतील त्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली.

बघता बघता त्यानं 30 चेंडूत अर्धशतक अन् नंतरच्या 21 चेंडूत शतक पूर्ण केलं. 18 व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर सूर्यानं मुंबई इंडियन्ससाठी विजयी षटकार ठोकला आणि त्याचं शतकही पूर्ण केलं.

या सामन्यात हार्दिक अन् सूर्याचा दिसलेल्या फॉर्मने टीम इंडियाचीही आशा पल्लवित केली आहे. कारण हे दोघेही जूनमध्ये भारतासाठी टी20 वर्ल्ड कप खेळताना दिसणार आहेत.

असो, मुंबईला आयपीएल 2024मध्ये सूर उशीरा गवसला असला, तरी आता मुंबई अन्य संघांची गणितं मात्र बिघडवाताना दिसू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.