Mystery Girl IPL 2022: कॅमेरात कैद झालेल्या 'मिस्ट्री गर्ल'चा सोशल मीडियावर धुमाकूळ

सोशल मीडियावर मॅच बाहेरील एका मिस्ट्री गर्लची चर्चा सध्या जोरात रंगली आहे
Mystery Girl in IPL 2022
Mystery Girl in IPL 2022sakal
Updated on

Mystery Girl IPL 2022 : दिल्ली-कोलकाता मॅचमध्ये 'मिस्ट्री गर्ल' म्हणून सध्या एक मुलगी चांगलीच चर्चेत येत आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना झाला. दिल्लीने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. पण सोशल मीडियावर (Social Media) मॅच बाहेरील एका मिस्ट्री गर्लची चर्चा सध्या जोरात रंगलीआहे. जी खेळादरम्यान पडद्यावर दिसून आली होती.(Mystery Girl IPL 2022)

दिल्ली-कोलकाता सामन्यादरम्यान दिसणारा एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर चाहत्यांनी या मुलीला आयपीएल 2022 ची नवीन मिस्ट्री गर्ल घोषित केले. खरं तर, दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज कुलदीप यादवने सामन्यात शानदार झेल घेतल्यानंतर, कॅमेरामनने या मिस्ट्री गर्लवर (Mystery Girl IPL 2022) लक्ष केंद्रित केले आणि काही वेळाने स्क्रीनवर हा फोटो व्हायरल झाला.

ट्विटरवर लोकांनी पुन्हा एकदा कॅमेरामनचे आभार मानले आणि मॅचपेक्षा कॅमेरामन सतत मिस्ट्री गर्लवर जास्त फोकस करत असल्याचे सांगितले गेले. या मिस्ट्री गर्लचा फोटो वेगवेगळ्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला. याआधी या मोसमाच्या पहिल्या सामन्यातही एका मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल झाला होता. सामन्यादरम्यान दिलेली प्रतिक्रिया लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि खळबळ उडण्यास सुरुवात झाली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 215 धावांची मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीसाठी डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉने अर्धशतक ठोकले आणि शेवटी शार्दुल ठाकूरने शानदार फिनिशिंग केले. त्याचवेळी कोलकाताला केवळ 171 धावा करता आल्या, दिल्लीकडून कुलदीप यादवने 35 धावांत 4 बळी घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.