Virat Kohli IPL 2023 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जेव्हापासून फॉर्ममध्ये आला आहे. त्याने शतक आणि अर्धशतकांचा रतीब घातला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची देखील त्याने धडाकेबाज सुरूवात केली. विराट कोहलीने लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध आपले 46 वे आयपीएल अर्धशतक ठोकले. विराट कोहलीने हे अर्धशतक 35 चेंडूत पूर्ण केले. या हंगामातील त्याची ही दुसरी अर्धशतकी खेळी होती.
मात्र या अर्धशतकी खेळीवर न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक सिमॉन डोल नाराज दिसला. त्याने समालोचन करत असताना विराट कोहलीची खेळी माईलस्टोनसाठी होती असे वक्तव्य केले. यावर आता पाकिस्तानातून प्रतिक्रिया उमटली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार या बाबतीत विराट कोहलीच्या समर्थनात मैदानात उतरला.
सायमन समालोचन करताना ऑन एअर म्हणाला की, 'विराट कोहलीने खेळीची सुरूवात एखाद्या रल्वेसारखी धडाडती केली. तो हाणामारी करत होता. मात्र त्याने 42 धावांपासून 50 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी 10 चेंडू घेतले. त्याला माईल स्टोनची चिंता होती. मला या सामन्यात याची गरज नसल्याचे जाणवले. त्याने आक्रमक खेळायला हवे होते. त्यांच्या हातात विकेट्स होत्या.'
सायमनच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट म्हणाला, 'ज्यावेळी सायमन पाकिस्तानात असतो त्यावेळी तो बाबरबद्दल देखील असेच वक्तव्य करत असतो. जर त्याने शुद्धीत राहून सामना पाहिला तर विराट कोहली बिश्नोईला फटके मारण्याचा प्रयत्न करतो होता. मात्र तो मिस होत होता. हा एक खेळाचाच भाग आहे. त्याच्या नावावर 75 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. त्याला कोणालाही काहीही सिद्ध करून दाखवायंच नाहीये. हा निव्वळ मूर्खपणा आहे. सायमन क्रिकेट खेळला आहे. मात्र तो गोलंदाज होता.'
सलमान बट्ट पुढे म्हणाला, 'युवा खेळाडू माईल स्टोन गाठण्यासाठी अशा प्रकारे खेळतात. कारण त्यांना संघातील जागा पक्की करायची असते. विराट कोहली असं का करेल. आपण आरसीबीबद्दल बोलतोय. तो भारतीय संघात स्थान मिळावं म्हणून देखील झगडत नाहीये. तो जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे. अशा छोट्या विचाराच्या मानसिकतेतून बाहेर ये. बाबर, विराट कोहली आणि केन विलियम्सन यासारखे मोठे खेळाडू पॉवर हिटर नाहीयेत. मला वाटते सायमन लक्ष वेधू इच्छित होता.'
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.