IPL 2024 Sunrisers Hyderabad : 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा थरार रंगणार आहे, पण त्याआधी अनेक संघांमध्ये मोठी उलथापालथ सुरू आहे. काही संघांना नवीन मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे तर काही संघांच्या कर्णधारात बदल झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने सोमवार 4 मार्च रोजी आगामी हंगामासाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली. संघाने आपला नवा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची निवड केली आहे. काही महिन्यांपूर्वी 5 वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सनेही हार्दिक पांड्याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त करून सर्वांना चकित केले होते.
फ्रँचायझीने एडन मार्करामच्या जागी पॅट कमिन्स कर्णधारपदी निवड केली आहे, ज्याने मागील हंगामात सनरायझर्स हैदराबादची जबाबदारी स्वीकारली होती. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादची कामगिरी अत्यंत खराब होती, संघाने 14 पैकी 10 सामने गमावले आणि गुणतालिकेत ते तळाच्या स्थानावर राहिले होते.
आयपीएल 2024 च्या लिलावात हैदराबादने कमिन्सला 20.5 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन आपल्या संघात समाविष्ट केले होते. आता या खेळाडूला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यात मदत करण्यासोबतच कमिन्सने 2023 चा आयसीसी वर्ल्ड कपही जिंकला आहे. याच कारणामुळे हैदराबादनेही या खेळाडूवर विश्वास व्यक्त करत त्याच्यावर सर्वात मोठी जबाबदारी सोपवली आहे.
पॅट कमिन्सची आयपीएल कारकिर्द
आयपीएल 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पॅट कमिन्स खेळला नव्हता. याआधी तो 2020 ते 2022 पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, पॅट कमिन्सने 42 सामन्यांमध्ये 18.95 च्या सरासरीने आणि 152.21 च्या स्ट्राइक रेटने 379 धावा केल्या आहेत. 30.16 च्या सरासरीने आणि 8.54 च्या इकॉनॉमीने 45 बळी घेतले आहेत.
सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2024 संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, मार्को जॉन्सन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी.नटराजन, अनमोल नटराजन सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जातवेद सुब्रमण्यन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.