Pat Cummins News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात शु्क्रवारी (5 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला. हा हैदराबादचा दुसरा विजय ठरला. दरम्यान, हैदराबादचा नवा कर्णधार पॅट कमिन्सच्या एका कृतीची सध्या चर्चा सुरू आहे.
झाले असे की प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाकडून 19 व्या षटकात रविंद्र जडेजा आणि डॅरिल मिचेल फलंदाजी करत होते. यावेळी भुवनेश्वर कुमार हैदराबादकडून गोलंदाजी करत होता. त्याने चौथा चेंडू सुरेश यॉर्कर टाकला, ज्यावर जडेजाने क्रिजच्या पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र भुवनेश्वरने लगेचच तो चेंडू पकडला आणि जडेजाला धावबाद करण्यासाठी स्टंपच्या दिशेने फेकला. त्याचवेळी जडेजा स्वत:ला वाचवण्यासाठी मागे फिरला, मात्र त्यावेळी भुवनेश्वरने फेकलेला झेल जडेजाच्या पाठीला लागला. त्यामुळे क्लासेनने जडेजा थ्रोच्या मध्ये आल्याचे सुचवले.
यामुळे क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याचा प्रश्न उभा राहिल्याने मैदानातील पंचांना हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. मात्र याचवेळी कमिन्सने पंचांना कळवले की तो हे अपील मागे घेत आहे. त्याला अशाप्रकारे जडेजाला बाद द्यायचे नाही. कमिन्सच्या या कृतीमुळे अनेकांनी त्याचे कौतुक केले. त्याने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने अनेक चाहत्यांची मनंही जिंकली.
मात्र असे असले तरी भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने मात्र कमिन्सच्या अपील मागे घेण्याचा निर्णय एक डावपेच असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट केले की पॅट कमिन्सने जडेजाविरुद्ध क्षेत्ररक्षणात अडथळा आणण्याचे अपील मागे घेतल्याने दोन प्रश्न उभे राहतात.
फलंदाजीसाठी संघर्ष करणाऱ्या जडेजाला मैदानातच ठेवून धोनीला फलंदाजीला न येऊ देण्याची ही एक चालाखी होती का? दुसरा म्हणजे टी20 वर्ल्डकपमध्ये तो विराट कोहलीच्या बाबतीत पण अशीच खिलाडूवृत्ती दाखवणार का?'
कैफच्या या ट्वीटवर अनेक युजर्सने कमेंट केल्या आहेत. काहींनी त्याला योग्य म्हटले असले, तरी काहींनी त्याला विरोधही केला आहे. याशिवाय काही युजर्सने प्रश्न विचारला आहे की कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाचा कर्णधार नाही, त्यामुळे तो विराट कोहलीविरुद्ध असा निर्णय का घेईल.
खरंतर कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि वनडे कर्णधार असला, तरी त्याच्याकडे टी20 संघाचे नेतृत्व नाही. गेल्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाचे नेतृत्व मिचेल मार्शने केले आहे, त्यामुळे तोच जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्येही ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की कमिन्स आयपीएल 2024 मधून पहिल्यांदाच टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना दिसत आहे.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 165 धावा केल्या होत्या. त्यानंतर 166 धावांचे आव्हान हैदराबादने 18.1 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.