pbks vs dc rishabh pant Marathi News
pbks vs dc rishabh pant Marathi Newssakal

IPL 2024 PBKS Vs DC : अपघातानंतर मैदानात परतल्यानंतर ऋषभ पंत झाला भावूक! भविष्यातील रणनीतीवर म्हणाला...

IPL 2024 PBKS Vs DC Rishabh Pant : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या दुसऱ्या सामन्यात आज पंजाब किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.
Published on

IPL 2024 PBKS Vs DC Rishabh Pant : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या दुसऱ्या सामन्यात आज पंजाब किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

pbks vs dc rishabh pant Marathi News
Shaharyar Khan passes away : पाकिस्तान क्रिकेटच्या माजी अध्यक्षाचे निधन, सैफ अली खानच्या घराण्याशी आहे थेट कनेक्शन

अशा परिस्थितीत ऋषभ पंतचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना दिसणार आहे. अपघातानंतर परतलेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत नाणेफेकीदरम्यान भावूक झाला. यावेळी त्यांनी भविष्यातील रणनीतीबाबतही चर्चा केली.

pbks vs dc rishabh pant Marathi News
IPL 2024 : 'माही भाई...' ऋतुराज गायकवाडने सांगितला CSK vs RCB सामन्याचा टर्निंग पॉइंट

नाणेफेक दरम्यान पंत म्हणाला की, “आम्ही पण आधी फलंदाजी कराची होती. विकेट थोडी संथ दिसत आहे. माझ्यासाठी हा खरोखरच भावनिक काळ आहे. मला फक्त या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. मी जास्त विचार करत नाही. मला गेल्या हंगामाची चिंता नाही. माझ्यासाठी हा खरोखरच रोमांचक काळ आहे. आम्ही चांगली तयारी करत आहोत. आमच्याकडून शाई होप, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर आणि ट्रस्टन स्टब्स हे चार परदेशी खेळाडू मैदानात उतरतील.

pbks vs dc rishabh pant Marathi News
उद्घाटन सोहळा ते शिवम दुबेचा CSK साठी विजयी चौकार, असा होता IPL 2024 चा पहिला दिवस, पाहा एका क्लिकवर

31 डिसेंबर 2022 रोजी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घराकडे जात होता. त्यावेळी पहाटे त्यांच्या कारचा अपघात झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की ऋषभ पंतच्या कारचा चुराडा झाला. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पायाला इतकी गंभीर दुखापत झाली होती की त्याला बरे होण्यासाठी सुमारे 14 महिने लागले.

ऋषभ पंतला ओळखणाऱ्या आणि त्याच्यासोबत खेळणाऱ्या खेळाडूंना त्यावेळी वाटले होते की, ऋषभ पंत जवळपास 2 ते 3 वर्षांनी मैदानात परतेल, पण ऋषभ पंतने इच्छाशक्तीच्या जोरावर 14 महिन्यांनंतर पुन्हा एकदा ते करून दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.