Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Scorecard Updates : आयपीएल 2024 मध्ये 23वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा पराभव केला. हैदराबादचा या हंगामातला हा तिसरा विजय आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला 20 षटकांत 6 गडी गमावून 180 धावा करता आल्या.
पंजाबकडून शशांक सिंग आणि आशुतोष यांनी अप्रतिम खेळी खेळली पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. शशांक सिंगने 46 धावांची तुफानी खेळी तर आशुतोषने 33 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 29 धावांची गरज होती पण जयदेव उनाडकटच्या या षटकात दोन्ही फलंदाज केवळ 26 धावा करू शकले.
पंजाब किंग्जला विजयासाठी सहा चेंडूत 29 धावा करायच्या असून शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा क्रीजवर आहेत. जयदेव उनाडकट शेवटचे षटक टाकायला आला आहे. आशुतोषने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. उनाडकटने पुढचे दोन चेंडू वाईड टाकले.
आता पंजाबला पाच चेंडूत 21 धावांची गरज आहे.
दुसऱ्या चेंडूवर आशुतोषने शानदार षटकार ठोकला.
पंजाबला चार चेंडूत 15 धावा करायच्या आहेत. आशुतोषने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा केल्या.
परत चौथ्या चेंडूवर आशुतोषनेही दोन धावा चोरल्या. आता पंजाबला दोन चेंडूत 11 धावा करायच्या आहेत.
उनाडकटने पुन्हा वाईड बॉल टाकला. त्यानंतर आशुतोषने सिंगल घेतला. आणि शशांकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला.
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सॅम करनने पंजाब किंग्जचा डाव सांभाळला आहे. करणने सलग फटके खेळून हैदराबादच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. करण सध्या 14 चेंडूत 20 धावा केल्यानंतर खेळत आहे आणि सिकंदर रझा सहा चेंडूत आठ धावा केल्यानंतर त्याच्यासोबत क्रीजवर उपस्थित आहे.
युवा फलंदाज नितीश रेड्डीच्या 37 चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने केलेल्या 64 धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जला 183 धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी बऱ्याच अंशी योग्य ठरविला.
मात्र, नितीशच्या जोरावर हैदराबादने 20 षटकांत नऊ गडी गमावून 182 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंगने चार, तर सॅम कुरन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
पंजाबविरुद्ध हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. आणि 39 धावांवर तीन गडी गमावले. अर्शदीप सिंगने हैदराबादच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच रोखून धरले आणि उर्वरित कामगिरी करण आणि हर्षलने केली.
मात्र, नितीश रेड्डीने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने अब्दुल समदसोबत सहाव्या विकेटसाठी 19 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. समदनेही हैदराबादसाठी वेगवान खेळी खेळली आणि तो 12 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 25 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या दोन फलंदाजांशिवाय संघाचा अन्य कोणताही फलंदाज छाप पाडू शकला नाही.
जबरदस्त फॉर्मात असलेल्या नितीश रेड्डीला बाद करत अर्शदीप सिंगने सनरायझर्स हैदराबादला सातवा धक्का दिला. नितीशची अर्धशतकी खेळी संपुष्टात आली, तर अर्शदीपने सामन्यातील चौथी विकेट घेतली. नितीश 37 चेंडूत 64 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करत संघाला सहावे यश मिळवून दिले आहे. अब्दुल समदला बाद करून अर्शदीपने नितीश रेड्डीसोबतची 50 धावांची भागीदारी मोडली. समद 12 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 25 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादला आणखी एक धक्का दिला आहे. राहुल त्रिपाठीही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. राहुल 14 चेंडूत 11 धावा करून बाद झाला.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादवर दडपण आणले. या सामन्यात हैदराबादची सुरुवात खराब झाली आणि पहिल्या सहा षटकात तीन विकेट्स गमावल्या. सध्या राहुल त्रिपाठी आणि नितीश रेड्डी क्रीजवर आहेत.
पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सनरायझर्स हैदराबादला तीन चेंडूतच दुहेरी झटका दिला आहे. ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर अर्शदीपने नवा फलंदाज म्हणून आलेल्या एडन मार्करामलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. मार्कराम खाते न उघडताच बाद झाला.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, सॅम कुरन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, शाहबाज अहमद, हेनरिक क्लासेन, नितीश राणा, अब्दुल समद, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखरने नाणेफेकदरम्यान सांगितले की, लियाम लिव्हिंगस्टोन दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि तो या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. पंजाबचा संघ या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. सनरायझर्स हैदराबादनेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.