SRH vs LSG : हैदराबाद हरली! लखनौने मुंबईसकट चार संघाचे वाढवले टेन्शन

IPL 2023 Point Table
IPL 2023 Point Table esakal
Updated on

Lucknow Super Giants Defeat Sunrisers Hyderabad IPL 2023 Point Table : लखनौ सुपर जायंट्सने सनराईजर्स हैदराबादचे 183 धावांचे आव्हान 19.2 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. लखनौकडून प्रेरक मंकडने 64, मार्कस स्टॉयनिसने 40 तर निकोलस पूरनने 13 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले.

या विजयाबरोबरच लखनौ पॉवर प्लेच्या रेसमध्ये पुन्हा एकदा दाखल झाली आहे. ते आता 13 गुण घेत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहचवले आहे. त्यांचे नेट रनरेट +0.309 असून अजून त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. जर लखनौने आपले दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 17 गुण होतील.

या दोन सामन्यातील एक सामना हा मुंबई इंडियन्ससोबत 16 मे रोजी लखनौच्या एकाना स्टेडियमवर होणार आहे. होम ग्राऊंडवर होणाऱ्या या सामन्यात मुंबई किंवा लखनौच्या प्ले ऑफ खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा होणार आहे.

IPL 2023 Point Table
Gautam Gambhir Controversy : चिटिंग करता हैं तू! गंभीरच्या LSG डगआऊटवर प्रेक्षकांनी फेकल्या वस्तू

हैदराबादने ठेवलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर कायल मेयर्सला 14 चेंडूत फक्त 2 धावा करता आल्या. तो चौथ्या षटकात बाद झाला. दुसरा सलामीवीर क्विंटन डिकॉकने 19 चेंडूत 29 धावा केल्या खऱ्या मात्र त्याला मार्कंडेयने बाद करत लखनौला 8 व्या षटकात दुसरा धक्का दिला होता.

मात्र या दोन धक्क्यातून लखनौला प्रेरक मंकडने सावरले. त्याने मार्कस स्टॉयनिस सोबत तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे लखनौने 15 व्या षटकात 127 धावांपर्यंत मजल मारली. ही जोडी हैदराबादला जड जाणार असे वाटत असतानाच अभिषेक शर्माने 25 चेंडूत 40 धावा ठोकणाऱ्या स्टॉयनिसला 16 व्या षटकात बाद केले.

IPL 2023 Point Table
SRH vs LSG : क्लासेनचा क्लास त्याला समादची साथ! हैदराबादने लखनौसमोर ठेवले 183 धावांचे आव्हान

स्टॉयनिस बाद झाल्यानंतर आलेल्या निकलोस पूरनने हैदराबादला सामन्यात पुनरागमन करण्याची अजून एक संधी न देता आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्याच्या जोडीला असलेल्या मंकडने आपले अर्धशतक पूर्ण केले.

या दोघांनी सामना 12 चेंडूत 14 धावा असा जवळ आणला. त्यानंतर नटराजनच्या 19 व्या षटकात 10 धावा करत शेवटच्या षटकात फक्त 4 धावा शिल्लक ठेवल्या. पूरनने पहिल्या दोन चेंडूतच या धावा पूर्ण करत लखनौला महत्वाचा विजय मिळवून दिला. निकोलस पूरनने 13 चेंडूत 44 धावा ठोकल्या. यात 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले. हैदराबादकडून हेन्री क्लासनने 47 धावांची अब्दुल समादने नाबाद 37 धावांची खेळी केली. सलामीवीर अनमोलप्रीतनेही 36 धावांचे योगदान दिले. लखनौकडून कृणाल पांड्याने 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.