Prithvi Shaw : 'क्रिकेटर कमी अन् MC Stanचीच...', पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंड सोबतच्या व्हिडिओवर चाहते भडकले

Prithvi Shaw : 'क्रिकेटर कमी अन् MC Stanचीच...', पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंड सोबतच्या व्हिडिओवर चाहते भडकले
Updated on

Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia : भारतीय क्रिकेट संघ आणि डीसीचा फलंदाज पृथ्वी शॉ नेहमीच चर्चेत असतो, मागच्या वेळी तो एका भोजपुरी चित्रपट अभिनेत्रीसोबत झालेल्या भांडणामुळे आला होता. मात्र यावेळी तो त्याची गर्लफ्रेंड निधी तापडियासोबत IIFA अवॉर्ड शोमध्ये दिसला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंड सोबतच्या व्हिडिओवर चाहते चांगले भडकले.

Prithvi Shaw : 'क्रिकेटर कमी अन् MC Stanचीच...', पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंड सोबतच्या व्हिडिओवर चाहते भडकले
Mumbai Indians: शुभमन गिलचा झेल... दुखापत... पॉवर हिटरचे अपयश...; जाणुन घ्या मुंबईच्या पराभवाची 5 कारणे

पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड निधी तापडिया ही महाराष्ट्रातील नाशिकची रहिवासी आहे. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1997 रोजी झाला. ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. निधी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंस्टाग्रामवर त्याचे 108 हजार फॉलोअर्स आहेत. निधीने वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेतले आहे.

निधीने 2016 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. निधीने प्रसिद्ध क्राईम शो सीआयडीमध्येही काम केले आहे. याशिवाय 2019 मध्ये निधी पंजाबी गाणे जट्टा कोका या व्हिडिओमध्ये देखील अभिनय करताना दिसली होती.

दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसले आहेत. मात्र, पृथ्वी किंवा निधी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

Prithvi Shaw : 'क्रिकेटर कमी अन् MC Stanचीच...', पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंड सोबतच्या व्हिडिओवर चाहते भडकले
Rohit Sharma IPL 2023: पराभवानंतर कर्णधार रोहित संघावर भडकला! कोणाच्या माथी फोडले खापर

मात्र, गेल्या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी शॉने निधीसोबतचा एक फोटो शेअर करून तो डिलीट केला. इतकंच नाही तर आता निधी शॉला मैदानात सपोर्ट करायला आली होती, या सगळ्या गोष्टींवरून दोघेही नात्यात असल्याचं उघड झाले आहे. एकेकाळी केएल राहुल आणि अथिया शेट्टी होते. तथापि शॉ आणि निधी रिलेशनशिपमध्ये आहेत, आतापर्यंत याला कोणत्याही प्रकारे पुष्टी मिळालेली नाही.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉबद्दल बोलायच झाले तर, 8 कोटी खर्चून कायम ठेवलेल्या शॉला 6 सामन्यांत केवळ 47 धावा करता आल्या. त्याच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर प्रशिक्षक रिकी पाँटिंगही त्याला फार काळ साथ देऊ शकले नाहीत. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने फिल सॉल्टला संघात घेतले, ज्याला 2 कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले होते, ज्याने पाच डावांत सुरुवात केली आणि 30 पेक्षा जास्त सरासरीने आणि दोन अर्धशतकांसह 151 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.