मुंबई : पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 54 धावांनी पराभव करत गुणतालिकेत आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली. पंजाबने ठेवलेल्या 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 20 षटकात 9 बाद 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून कसिगो रबाडाने 3 तर राहुल चहर आणि ऋषी धवन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर पंजाबकडून फलंदाजी लिम लिव्हिंगस्टोनने 70 तर जॉनी बेअरस्टोने 66 धावांची दमदार खेळी केली. (Punjab Kings Defeat Royal Challengers Bangalore PBKS Jumped on 6th Spot In IPL 2022 Point Table)
पंजाब किंग्जचे 210 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीने दमदार सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीने आक्रमक अंदाजात फलंदाजी करत 14 चेंडूत 20 धावांपर्यंत मजल मारली. मात्र कसिगो रबाडाचा एक लेग साईडचा चेंडू फटकावण्याच्या नादात त्याच्या बॅटची कडा लागली आणि शॉर्ट फाईनला उभ्या असलेल्या राहुल चहरच्या हातात झेल विसावला.
त्यानंतर ऋषी धवनने आरसीबीला मोठा धक्का दिला. त्याने संघाचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसला 10 धावांवर बाद करत दुसरा सलामीवीर देखील माघारी धाडला. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फाफ ड्युप्लेसिसला बाद केल्यानंतर ऋषी धवनने याच षटकात पाचव्या चेंडूवर महिपाल लोमरोरला 6 धावांवर बाद करत आरसीबीला तिसरा धक्का दिला. आरसीबीने 40 धावांवर 3 फलंदाज गमावल्यानंतर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी चौथ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचली.
मात्र राहुल चहरने 26 धावा करणाऱ्या रजत पाटीदारला बाद करत ही जोडी फोडली. 22 चेंडूत 35 धावांची खेळी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीला 10 षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र हरप्रीत ब्रारने त्याला 35 धावांवर बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला. अर्शदीप सिंगने दिनेश कार्तिकला 11 धावांवर बाद करत सहावा धक्का दिला.
यानंतर आलेल्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. अखेर आरसीबीचा डाव 20 षटकात 9 बाद 155 धावात संपुष्टात आला.
आयपीएलच्या 60 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. मात्र पंजाब किंग्जच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत आरसीबीचा हा निर्णय चुकीचा ठरवला. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन यांनी 5 षटकातच 60 धावांची सलामी दिली. दरम्यान, मॅक्सवेलने शिखर धवनला (21) बाद करून पहिला धक्का दिला.
मात्र दुसऱ्या बाजूने तडाखेबाज फलंदाजी करणाऱ्या बेअरस्टोने आरसीबीच्या गोलंदाजांची पिसे काढण्यास सुरूवात केली. त्याने पंजबला पॉवर प्लेमध्येच 83 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, राजपक्षा अवघ्या 1 धावेची भर घालून परतला. त्यानंतर लिम लिव्हिंगस्टोनने बेअरस्टोबरोबर भागीदारी रचण्यास सुरुवात केली. मात्र ही जोडी शाहबाज अहमदने फोडली. त्याने 29 चेंडूत 66 धावांची खेळी करणाऱ्या बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टोनंतर आलेला मयांक देखील 19 धावांची भर घालून परतला. त्याला हर्षल पटेलने बाद केले.
दुसऱ्या बाजूने लिव्हिंगस्टोनने आक्रमक अवतार धारण केला. त्याने अर्धशतक ठोकल्यानंतर आपल्या खेळीचा वेग वाढवला. दरम्यान, दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. मात्र लिव्हिंगस्टोनने हेजलवूड टाकत असलेल्या 19 व्या षटकात तुफान फटकेबाजी करत 24 धावा वसूल केल्या. त्याने पंजाबला 200 चा टप्पा पार करून दिला. मात्र अखेरच्या षटकात हर्षल पटेलने लिव्हिंगस्टोनला बाद करत मोठा धक्का दिला. हर्षल पटेलने शेवटच्या षटकात 4 धावा देत दोन बळी टिपले. अखेर पंजाबचा डाव 20 षटकात 9 बाद 209 धावांवर संपला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.