SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

Punjab Kings Record: पंजाब किंग्स सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल 2024 मधील शेवटचा सामना खेळण्यासाठी एका ऐतिहासिक निर्णायसह मैदानात उतरला होता.
Punjab Kings
Punjab KingsSakal
Updated on

Punjab Kings Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 69 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात रविवारी (19 मे) झाला. या सामन्यात हैदराबादने 4 विकेट्सने जिंकला. दरम्यान, या सामन्यात पराभव स्विकारला असला तरी पंजाब किंग्सने एक इतिहासही रचला.

पंजाब किंग्सने या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये रिली रुसो या एकमेव परदेशी खेळाडूला खेळवले होते. म्हणजे या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर मिळून पंजाबकडून 11 भारतीय खेळाडू खळले, तर एकच रुसोच्या रुपात परदेशी खेळाडू खेळला.

त्यामुळे पंजाब पहिलाच संघ ठरला, ज्यांनी आयपीएल सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ एकच परदेशी खेळाडू खेळवला. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं की आयपीएल सामन्यात एखाद्या संघाकडून केवळ एकच परदेशी खेळाडू खेळला.

पंजाबला हा निर्णय घ्यावा लागला कारण त्यांचे काही परदेशी खेळाडू राष्ट्रीय संघाप्रती असलेल्या वचनबद्धतेमुळे, तर काही परदेशी खेळाडू दुखापतीमुळे मायदेशी परतले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फार पर्याय उपलब्ध नव्हते.

Punjab Kings
RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन आयपीएल 2024 मधील पाच सामने खेळल्यानंतर दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे नंतर सॅम करनने संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती.

मात्र, हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॉनी बेअरस्टो हे पंजाबकडून खेळणारे इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले. त्यांना पुढील आठवड्यात पाकिस्तानविरुदध टी20 मालिका खेळायची आहे. तसेच कागिसो रबाडाही दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे.

वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला या सामन्यात खेळवण्यात आले नाही. त्यामुळेच केवळ रिली रुसौ हैदराबादविरुद्ध एकच परदेशी खेळाडू म्हणून पंजाबकडून खेळला. तसेच शिखर आणि सॅम करन यांच्या अनुपस्थितीत जितेश शर्माने या संघाचे नेतृत्व केले.

Punjab Kings
IPL 2024: प्लेऑफमधील प्रवेशानंतर RCB चाहत्यांचे स्टेडियमबाहेर CSK समर्थकांबरोबर गैरवर्तन? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 214 धावा केल्या होत्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगन सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. तसेच रिली रुसोने 49 आणि अर्थर्व तायडेने 46 धावा केल्या. हैदराबादकडून टी नटराजनने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग हैदराबादने 19.1 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली.

तसेच हेन्रिक क्लासेनने 42 धावांची खेळी केली, तर नितीश रेड्डीने 37 आणि राहुल त्रिपाठीने 33 धावांची खेळी केली. पंजाबकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

पंजाबचा हा आयपीएल 2024 मधील अखेरचा सामना होता. या सामन्यापूर्वीच त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.