KKR vs PBKS, IPL 2024 Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 42 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने 8 विकेट्सने विजय मिळवला. पंजाबचा हा विजय ऐतिहासिक ठरला.
या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 261 धावा केल्या आणि पंजाबसमोर 262 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग पंजाबने 2 विकेट्स गमावत अवघ्या 18.4 षटकातच पूर्ण केला.
या संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून 523 धावा निघाल्या. यादरम्यान एकूण 42 षटकार मारण्यात आले. त्यातील 24 षटकार पंजाब किंग्सने ठोकले, तर 18 षटकार कोलकाताने ठोकले. त्यामुळे एकूणच या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले.
धावांचा पाठलाग करताना पंजाबने मिळवलेला हा केवळ आयपीएलमधीलच नाही, तर पुरुषांच्या टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. तसेच टी20 क्रिकेटमधील एकाच सामन्यात 42 षटकार मारण्याचीही ही पहिलीच वेळ ठरली आहे.
262 धावा - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2024
259 धावा - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, 2023
253 धावा - मिडलसेक्स विरुद्ध सरे, द ओव्हल, 2023
244 धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड, 2018
42 षटकार - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, कोलकाता, 2024
38 षटकार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद, 2024
38 षटकार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, बेंगळुरु, 2024
37 षटकार बाल्ख लिजंड्स विरुद्ध काबुल झ्वानन, 2018
37 षटकार - सेटं किट्स अँड नेविस पेट्रिओट्स विरुद्ध जमैका तलावाह, 2019
262 धावा - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2024
262 धावा - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2024
259 धावा - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, 2023
254 धावा - मिडलसेक्स विरुद्ध सरे, द ओव्हल, 2023 (धावांचे लक्ष्य 253)
253 धावा - क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध मुलतान सुलतान, रावळपिंडी, 2023
262 धावा - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2024
224 धावा - राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स, शारजाह, 2020
224 धावा - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2024
219 धावा - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, 2021
24 षटकार - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2024
22 षटकार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, बेंगळुरू, 2024
22 षटकार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, 2024
21 षटकार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2013
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.