आयपीएलच्या 33 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने पंजाबसमोर 193 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पंजाबला 20 षटकात सर्वबाद 183 धावांपर्यंतच मजल मारता आली.
पंजाबकडून शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी झुंजार खेळ केला. शशांकने 41 तर आशुतोषने 28 चेंडूत 61 धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, गेराल्ड कॉट्झी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या तर आकाश माधवाल, हार्दिक पांड्या आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी करत 78 धावा ठोकल्या. त्याला रोहित शर्माने 36 तर तिलक वर्माने 34 धावा करून चांगली साथ दिली.
आशुतोष शर्माने 28 चेंडूत 61 धावा ठोकल्या तर शशांक सिंहने 25 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. त्यानंतर हरप्रीत ब्रारने 21 धावा करत पंजाबला सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी पंजाबला 183 धावात रोखत सामना 9 धावांनी जिंकला.
शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी पुन्हा एकदा पंजाबसाठी कमाल करण्याचा प्रयत्न केला. निम्मा संघ गारद झाला असतानाही त्यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला 11 व्या षटकात 100 धावा करून दिल्या.
डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या शशांक सिंह आणि जितेश शर्माची जोडी अखेर आकाश माधवालने फोडली. त्याने जितेश शर्माला 9 धावांवर बाद केलं. यामुळे पंजाबची अवस्था 6 बाद 77 धावा अशी झाली.
जसप्रीत बुमराह जेराल्ड कॉट्झेच्या भेदम माऱ्यासमोर पंजाब किंग्जची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. पंजाबची अवस्था 5 बाद 49 धावा अशी झाली असताना शशांक सिंहने एकाकी किल्ला लढवत पंजाबची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला.
सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर आलेला हार्दिक पांड्या 10 धावांची भर घालून परतला. त्यानंतर तिलक वर्मा आणि टीम डेव्हिडने स्लॉग ओवरमध्ये फटकेबाजी केली. मात्र शेवटच्या षटकात हर्षल पटेलने मुंबईचे तीन फलंदाज बाद करून फक्त 7 धावा दिल्या. त्यामुळे मुंबईला 20 षटकात 7 बाद 192 धावांपर्यंत मजल मारता आली.
सॅम करनने रोहित शर्मापाठोपाठ सूर्यकुमार यादवला देखील पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र तोपर्यंत सूर्याने 53 चेंडूत 78 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सने 16 षटकात 148 धावांपर्यंत मजल मारली होती.
सॅम करनने चायनामनसारखा लेग स्पिन टाकत रोहित शर्माला 36 धावांवर बाद केलं. त्याने सूर्यकुमार यादव आणि रोहितची 81 धावांची भागीदारी तोडली.
मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. इशान किशन 8 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने 4 षटकात 40 धावा करत मुंबईला चांगली सुरूवात करून दिली.
पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबने आपल्या संघात काही बदल केले आहेत तर मुंबईने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. त्यात मुंबई इंडियन्स पंजाबवर थोडी वरचढ होताना दिसते. मुंबईने 16 तर पंजाबने 15 सामने जिंकले आहेत.
2020 पासून दोन्ही संघांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. त्यात मुंबईने 4 तर पंजाबने 3 सामने जिंकले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.