R Ashwin Sixes: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात जयपूरला सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएल 2024 स्पर्धेतील नववा सामना झाला. हा सामना राजस्थान रॉयल्सने 12 धावांनी जिंकला. या सामन्यात फिरकीपटू आर अश्विनची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली.
या सामन्यात आर अश्विन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्याने फलंदाजी क्रमवारीत मिळालेल्या बढतीचा फायदा घेतला. त्याने 10 व्या षटकात पाचव्या चेंडूवर कुलदीप यादवविरुद्ध लाँग ऑनला खणखणीत षटकार ठोकला.
त्यानंतर 11 व्या षटकात त्याने पहिल्या चेंडूवर त्याने एन्रिच नॉर्कियाविरुद्ध डीप मीड-विकेटच्या स्टँडच्या दिशेने षटकार ठोकला. त्यानंतर लगेचच चौथ्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला.
त्याच्या या फटकेबाजीमुळे राजस्थानच्या डावाला गती मिळाली. दरम्यान, अश्विनला 14 व्या षटकात अक्षर पटेलने बाद केले. ट्रिस्टन स्टब्सने त्याचा झेल घेतले.
या सामन्यात राजस्थानकडून रियान परागने शानदार खेळी केली. त्याने 45 चेंडूत 7 चौकार 6 षटकारांसह 84 धावांची नाबाद खेळी केली. यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 185 धावा केल्या.
दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार, एन्रिच नॉर्किया, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने 34 चेंडूत 49 धावांची खेळी केली. तसेट ट्रिस्टन स्टब्सने 23 चेंडूत 44 धावांची खेळी केली. मात्र दिल्लीला 20 षटकात 5 बाद 173 धावाच करता आल्या. राजस्थानकडून नांद्रे बर्गर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतली. तसेच आवेश खानने १ विकेट घेतली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.