'जानी दुश्मनीचा दि एन्ड'; अश्विन-बटलरचं एका फ्रेममध्ये 'रॉयल प्रेम'

Jos Buttler and R Ashwin
Jos Buttler and R AshwinSakal
Updated on

भारतीय संघातील फिरकीपटू आर अश्विन आणि इंग्लंडचा स्टार बॅटर जोस बटलर (Jos Buttler) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) इतिहासात पहिल्यांदाच एकच ड्रेसिंग रूम शेअर करताना दिसणार आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामात दोन्ही खेळाडू राजस्थान रॉयल्सची जर्सी घालून मैदानात उतरतील. बटलर 2018 पासूनच राजस्थान रॉयल्सच्या संघाचा भाग आहे. दुसरीकडे आर अश्विन (R Ashwin) आयपीएलमध्ये पहिल्यांदाच राजस्थानचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल.

मैदानात अश्विन आणि बटलर यांच्यातील एक वाद चांगलाच गाजला होता. 2019 मध्ये आयपीएलच्या बाराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत असताना रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडींग करत रनआऊट केले होते. याची चांगलीच चर्चा रंगली होती. अश्विनचे कृत्य खिलाडीवृत्तीचे नाही, अशी प्रतिक्रिया बटलरने दिली होती. ही घटना दोघांमध्ये जानी दुश्मनी निर्माण करणारी अशीच होती.

Jos Buttler and R Ashwin
मॅक्सवेल-विनीच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट; फोटो व्हायरल

पण आता दोघही एकाच संघाकडून खेळताना दिसणार आहेत. राजस्थान रॉयल्सने स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मंगळवारी अश्विन-बटलरचा नेट्समधील एक खास फोटो शेअर केला. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. काहींना मंकडींगचा वाद आठवत आहे. तर काही जण दोघांना एकत्र पाहून सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. नेटकरी हा फोटो दिवसातील सर्वोत्तम आहे, असेही म्हणत आहेत. काही क्रिकेट चाहते मजेदार मीम्सच्या माधअयमातून या फोटोवर गंमतीशीर कमेंट्स देत आहेत.

Jos Buttler and R Ashwin
IPL 2022 : लखनऊ सुपर जाएंट्सची पहिली जर्सी लॉन्च, पाहा खास झलक

यंदाच्या हंगामात अश्विनसह युजवेंद्र चहल राजस्थानच्या ताफ्यातील फिरकीचे कमान सांभाळणार आहेत. राजस्थानने अश्विनला पाच कोटी मोजून संघात घेतलं आहे. बटलर आगामी हंगामात यशस्वी जयस्वालच्या साथीनं किंवा संजू सॅमसनसोबत डावाला सुरुवात करताना दिसू शकतो. राजस्थान आयपीएलच्या मेगा लिलावाआधीच बटलरला 10 कोटीत रिटेन केले होते. राजस्थान रॉयल्स 29 मार्चला पुण्याच्या मैदानातून सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या लढतीने स्पर्धेला सुरुवात करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.