Hardik Pandya: 'भारतात फॅनवॉर नको...', ट्रोल होणाऱ्या हार्दिकच्या पाठिंब्यासाठी अश्विनसह उतरले 'हे' दिग्गज

Mumbai Indians Captain: मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्माच्या हार्दिक पंड्याकडे सोपवल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशात पाठिंब्यासाठी काही दिग्गज खेळाडूंबरोबरच सेलिब्रेटी उतरले आहेत.
Hardik Pandya | R Ashwin | IPL 2024
Hardik Pandya | R Ashwin | IPL 2024Sakal
Updated on

Hardik Pandya News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा सध्या सुरू आहे. पण अशातच सध्या मुंबई इंडियन्सचा संघ सातत्याने चर्चेत येत आहे. यामागचे कारण मैदानातील कामगिरीपेक्षाही नेतृत्वबदल हे आहे.

आयपीएल 2024 लिलावानंतर मुंबई इंडियन्सने सर्वांनाच मोठा धक्का दिला. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला गुजरातकडून ट्रेड करत पुन्हा संघात घेतले आणि त्याच्याकडे रोहित शर्माच्या जागेवर नेतृत्वाची धूराही सोपवली.

रोहितला काढून हार्दिककडे मुंबईच्या नेतृत्वाची धूरा सोपवल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत. हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले जात आहे. त्यामुळे आता हार्दिकच्या पाठिंब्यासाठी काही दिग्गज खेळाडूंबरोबरच सेलिब्रेटी उतरले आहेत.

खरंतर रोहितच्या नेतृत्वात मुंबईने गेल्या 10 वर्षात 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, असे असताना त्याला काढून हार्दिककडे ही जबाबदारी सोपवल्याने चाहते नाराज आहेत. तसेच हार्दिक 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला होता, परंतु 2022 मध्ये त्याला करारमुक्त करण्यात आले होते. त्यावेळी गुजरातने त्याला संघात घेत कर्णधारही केले.

Hardik Pandya | R Ashwin | IPL 2024
Shreyas Iyer Video: 'मी गोंधळलोय, मला दोन प्लेइंग इलेव्हनच्या शीट दिल्या...', टॉसवेळी KKR कॅप्टनचा सावळा गोंधळ

त्याच्या नेतृत्वात गुजरातने 2022 मध्ये विजेतेपद मिळवले, तर 2023 मध्ये उपविजेतेपद मिळवले. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा संघात घेत नेतृत्व दिले. इतकेच नाही, तर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये अशीही माहिती देण्यात आली की हार्दिकने मुंबईत पुन्हा येण्यासाठी नेतृत्व देण्याची अट ठेवली होती.

या सर्व घटनांमुळे मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे चाहते मात्र दुखावले असून त्यांनी हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल करणे सुरू केले आहे. सामन्यादरम्यानही त्याचे प्रेक्षकांकडून हुटिंग होत आहे. पण आता याबाबत काही खेळाडूंसह काही सेलिब्रेटी हार्दिकच्या बाजूने उभे राहिले आहेत.

आर अश्विन म्हणाला, फॅन वॉर भारतात नको

आर अश्विनने म्हटले आहे की भारतात अशाप्रकारे फॅन वॉर व्हायला नको. त्याने आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना दुसऱ्या देशांचे उदाहरण दिले असून विचारले आहे की जो रुट आणि जोस बटलर किंवा जो रुट आणि जॅक क्रॉली किंवा स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स अशा खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये कधी भांडण झालेले पाहिले आहे का?

त्याचबरोबर त्याने असेही म्हटले की हे सिनेमा कल्चर असून यात मार्केटिंग, पोझिशन आणि ब्रँडिंग सारख्या गोष्टी आहेत.

Hardik Pandya | R Ashwin | IPL 2024
Virat Kohli-Gautam Gambhir Photo : कोहली अन् गंभीरचा 'तो' फोटो चर्चेत; दिल्ली पोलिसांनीही केली मजेशीर पोस्ट

त्याचबरोबर तो म्हणाला, 'फॅन वॉर अशा चूकीच्या मार्गावर जायला नको. हे पण लक्षात ठेवले पाहिजे की हा खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. असे असताना एका क्रिकेटपटूवर निशाणा साधण्यात काय अर्थ आहे?'

'मला हेच समजत नाहीये की जर आपल्याला एखादा खेळाडू आवडत नसेल आणि जर एखाद्या खेळाडूवर टीका करत असू तर त्याच्या संघाने त्याबाबत स्पष्टीकरण का द्यावे? आपण असं का वागत आहोत, जसे की हे आधी कधीच झालेले नाही?'

'सौरव गांगुलीच्या नेतृत्वात सचिन तेंडुलकर खेळला आहे आणि त्याच्या उलटही झाले आहे. ते दोघे राहुल द्रविडच्याही नेतृत्वात खेळले आहेत. ते तिघे अनिल कुंबळेच्याही नेतृत्वात खेळले आहेत आणि हे सर्व एमएस धोनीच्या नेतृत्वातही खेळले आहेत. धोनी पण विराटच्या नेतृत्वात खेळला आहे.'

याशिवाय अश्विनने असेही म्हटले की आपल्या आवडत्या खेळाडूंच्या खेळाचा आनंद घ्या, परंतु दुसऱ्या खेळाडूला कमी लेखू नका.

स्मिथचाही हार्दिकला सल्ला

स्मिथने हार्दिकला सल्ला दिला आहे की याकडे लक्ष देऊ नको. स्मिथ इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हटले की 'मी त्याला इतकेच सांगेल की या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस, हे सर्व असंबद्ध आहे. बाहेरच्या लोकांना माहित नसते की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात.'

याशिवाय स्मिथने असेही म्हटले की या सर्व ट्रोलिंगला हार्दिकने त्याच्या कामिगरीने उत्तर द्यायला हवे.

Hardik Pandya | R Ashwin | IPL 2024
Satwik-Chirag Badminton: सात्विक-चिरागने रचला इतिहास! 'ही' कामगिरी करणारे पहिलेच भारतीय, सायना नेहवालचा विक्रमही मोडला

सोनू सूदचाही हार्दिकला पाठिंबा?

अभिनेता सोनू सूदने हार्दिकचे नाव न घेता एक ट्वीट केले आहे. परंतु हे ट्वीट त्याने हार्दिकला पाठिंबा देण्यासाठीच केले असल्याचा कयास अनेक चाहत्यांनी लावला आहे. सोनू सूदने ट्वीट केले की 'ज्या खेळाडूंचा आपल्याला अभिमान वाटतो, ज्यांनी आपल्या देशाचा गौरव वाढवला आहे, त्या खेळाडूंचा आपण सन्मान केला पाहिजे.'

'एक दिवस आपण त्यांना पाठिंबा देतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांची हुर्यो उडवतो. यात ते नाही, तर आपण हारतो. मला क्रिकेट आवडेत.'

'मला तो प्रत्येक क्रिकेटपटू आवडतो, ज्याने माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. मग तो कोणत्या फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करतो, त्याने काही फरक पडत नाही. मग तो कर्णधार म्हणून खेळत असो किंवा 15 वा खेळाडू म्हणून संघात असो. ते आपले हिरो आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.