Rachin Ravindra IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये कोणत्या संघाकडून खेळणार? रचिन रविंद्रने दिली हिंट

रचिन रविंद्र IPL 2024: न्यूझीलंडच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळणार?
Rachin Ravindra IPL 2024
Rachin Ravindra IPL 2024esakal
Updated on

Rachin Ravindra IPL 2024:

भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये न्यूझीलंडने अखेरच्या क्षणी का असे ना आपलं सेमी फायनलचं तिकीट जवळपास निश्चित केलं. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

भारतीय वंशाच्या या क्रिकेटपटूवर भारतीय चाहतेच नाही तर आयपीएल फ्रिंचायजी देखील फिदा आहेत. एक तर वनडेमध्येही तो चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय दुसरी गोष्ट म्हणजे तो रविंद्र जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू देखील आहे.

त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजी भारतीय खेळपट्यांवर उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे आयपीएल फ्रेंचायजी त्याला आपल्या गोटात खेचण्यासाठी उत्सुक असणार आहेत.

Rachin Ravindra IPL 2024
World Cup 2023 : न्यूझीलंडचे एका दगडात दोन पक्षी! स्वतः उपांत्य फेरीत; पाकिस्तान जवळपास बाहेर...

आयपीएल 2024 चा मिनी लिलाव हा 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे. दरम्यान, रचिन रविंद्रने आपली फेव्हरेट आयपीएल टीम कोणती याबाबत नुकतीच हिंट दिली. रचिन रविंद्रने आपल्या पदार्पणाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये 9 सामन्यात 3 शतकांसह 565 धावा ठोकल्या आहेत. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात देखील 42 धावांची झुंजार खेळी केली.

दरम्यान, रचिनने न्यूझील - श्रीलंका सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, 'मला जोरदार पाठिंबा दिल्याबद्दल मी चिन्नास्वामी स्टेडियमचे आणि तेथील प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांनी माझ्या मनात एक खास जागा तयार केली आहे. मी इथे अजून क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.'

Rachin Ravindra IPL 2024
Anushka Sharma: गुड न्यूज खरी आहे तर! अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? व्हायरल व्हिडीओची चर्चा

रचिनने आपल्या या वक्तव्याने त्याला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून खेळण्यात अधीक रस असल्याचे संकेत मिळत आहेत. आता आयपीएलच्या लिलावात आरसीबी त्याला आपल्या गोटात खेचण्यासाठी किती ताकद लावते हे पहावे लागेल.

विशेष म्हणजे रचिनचे नाव हे राहुल द्रविड आणि सिचन तेंडुलकर यांच्या नावचे मिश्रण करून ठेवण्यात आले आहे. मात्र त्याची क्रिकेट खेळताना तो विराट कोहलीकडून प्रेरणा घेतो.

आयपीएल 2024 चा लिलाव हा 19 डिसेंबरला होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदात लिलाव हा विदेशात म्हणजे दुबईत होत आहे. बीसीसीआयने फ्रेंचायजींना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी देण्यासाठी 26 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.