IPL 2024 : 'माझी आई अजूनही हॉस्पिटलमध्ये...' KKRच्या विजयानंतर स्टार खेळाडूने व्यक्त केल्या भावना, ऐकून व्हाल थक्क

Rahmanullah Gurbaz Mother Hospitalized : आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा कोलकाता नाइट रायडर्स हा पहिला संघ ठरला आहे.
Rahmanullah Gurbaz Mother Hospitalized : आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा कोलकाता नाइट रायडर्स हा पहिला संघ ठरला आहे.
Rahmanullah Gurbaz Mother HospitalizedSAKAl
Updated on

Rahmanullah Gurbaz Mother Hospitalized : आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा कोलकाता नाइट रायडर्स हा पहिला संघ ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एकतर्फी सामन्यात श्रेयस अय्यरच्या संघाने विजय मिळवला. कोलकाताने 160 धावांचे लक्ष्य केवळ 13.4 षटकांत पूर्ण केले आणि 2 गडी गमावून विजयाची नोंद केली.

कोलकात्याच्या या विजयात रहमानउल्ला गुरबाजने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 14 चेंडूत 23 धावांची स्फोटक खेळी करत केकेआरला चांगली सुरुवात करून दिली. यादरम्यान त्याने 164.28 च्या स्ट्राईक रेटने दोन चौकार आणि तेवढेच षटकार ठोकले. सामन्यानंतर अफगाणिस्तानच्या यष्टीरक्षक फलंदाजाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Rahmanullah Gurbaz Mother Hospitalized : आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा कोलकाता नाइट रायडर्स हा पहिला संघ ठरला आहे.
RR Vs RCB : पाऊस पडणार की संपूर्ण मॅच होणार... जाणून घ्या कसे असणार एलिमिनेटर सामन्यात अहमदाबादचे हवामान?

खरं तर, फिल सॉल्ट मायदेशी परतल्यानंतर कोलकात्यासमोर सलामीवीराचे आव्हान होते. अशा परिस्थितीत कर्णधाराने रहमानउल्ला गुरबाजवर विश्वास व्यक्त केला आणि त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली. आणि त्याने हे संघ व्यवस्थापनाचा हा विश्वासही कायम ठेवत केकेआरला चांगली सुरुवात करून दिली. सामन्यानंतर त्याने सांगितले की त्याची आई आजारी आहे. असे असूनही तो येथे सामने खेळत आहे.

Rahmanullah Gurbaz Mother Hospitalized : आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा कोलकाता नाइट रायडर्स हा पहिला संघ ठरला आहे.
RR vs RCB : सामना न खेळता RCB आयपीएलमधून जाणार बाहेर? BCCIच्या 'या' नियमामुळे चाहते टेन्शनमध्ये

सामना संपल्यानंतर गुरबाज म्हणाला की, "'माझी आई अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे, मी तिच्याशी रोज बोलतो. पण फिल सॉल्ट गेल्यानंतर KKR कुटुंबाला माझी गरज भासेल हे मला माहीत होतं. म्हणून मी अफगाणिस्तानातून परत भारतात आलो, आणि इथे आल्याचा मला आनंद आहे. आणि यासोबत माझी आई देखील माझ्यासाठी आनंदी आहे."

गुरबाजने गेल्या मोसमात केकेआरकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आयपीएल 2023 मध्ये त्याने 11 सामन्यात 227 धावा केल्या होत्या. त्याचवेळी त्याने या हंगामातील पहिला सामना हैदराबादविरुद्ध खेळला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सने चमकदार कामगिरी केली आणि हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नेतृत्वाखाली केकेआरसाठी गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. यानंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद अर्धशतके झळकावत संघाला विजयापर्यंत नेले. कोलकाता संघ तीन वेळा क्वालिफायर-1 खेळला आहे आणि तिन्ही वेळा जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.