LSG vs CSK : चेन्नई - लखनौ सामन्यात पावसाने केला मोठा खेळ; धोनीचे चाहते नाराज तर पांड्याची गुजरात झाली खूष

Lucknow Super Giants vs Chennai Super King
Lucknow Super Giants vs Chennai Super Kingesakal
Updated on

Lucknow Super Giants vs Chennai Super King : लखनौच्या भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये आज महेंद्रसिंह धोनी अवतरला होता. त्यामुळे सर्व स्टेडियम पिवळ्या रंगात रंगून गेले. मात्र सामन्याची एक इनिंग संपण्यास काहीच चेंडू शिल्लक असताना पावसाने आपला खेळ सुरू केला आणि धोनीची बॅटिंग पाहण्याची लखनौकरांची संधी हिरावून गेला. पावसामुळे सामना कोणताही निकाल न लागता संपला. पावसाला सुरूवात होण्यापूर्वी प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नईने लखनौची अवस्था 19.2 षटकात 7 बाद 125 धावा अशी केली होती. लखनौच्या आयुष बदोनीने 33 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या होत्या. तर चेन्नईकडून मोईन अली, तिक्षाणा आणि पथिराना यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

मात्र आता पावसामुळे सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाले. यामुळे गुणतालिकेत कोणताच बदल झाला नाही. जर आजचा सामना लखनौने जिंकला असता तर त्यांनी गुणतालिकेत गुजरात जायंट्सला दुसऱ्या स्थान खेचून अव्वल स्थान पटकावले असते. जर चेन्नईने सामना जिंकला असता करत लखनौ तिसऱ्या स्थानी घसरली असती आणि चेन्नईचे गुजरातएवढेच 12 गुण झाले असते. मात्र पावसामुळे धोनी फॅन्स निराश झाले तर हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स सुखावली.

Lucknow Super Giants vs Chennai Super King
IPL 2023 : पगार वाढवा! कमवताय खेळाडूंच्या जीवावर, हिस्सेदारी फक्त 18 टक्के; खेळाडूंच्या संघटनेनं BCCI ला फटकालं

नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय चेन्नईच्या फिरकीपटूंनी सार्थ ठरवत लखनौचा निम्मा संघ 50 धावातच गारद केला. पॉवर प्लेमध्ये मोईन अली आणि तिक्षाणा यांनी लखनौला धक्के दिले तर पॉवर प्लेनंतर रविंद्र जडेजाने लखनौच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली. त्यामुळे लखनौची अवस्था 12 षटकात 5 बाद 52 धावा अशी झाली.

लखनौचा निम्मा संघ 44 धावात गारद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनीने सहाव्या विकेटसाठी भागीदारी रचत लखनौचा डाव सावरला. या दोघांनी ही भागीदारी अर्धशतकापर्यंत पुढे नेते संघाला शंभरच्या जवळ पोहचवले.

Lucknow Super Giants vs Chennai Super King
MS Dhoni IPL Retirement : लखनौविरूद्धच्या सामन्यापूर्वीच धोनी निवृत्तीबाबत बोलला

निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांनी सहाव्या विकेटसाठी 48 चेंडूत 59 धावांची भागीदारी रचत संघाला 103 धावांपर्यंत पोहचवले. माज्ञ 18 व्या षटकात मथिशा पथिरानाने निकोलस पूरनला 20 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. मात्र यानंतर आयुष बदोनीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत स्लॉग ओव्हरमध्ये फटेकबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर लखनौ देखील 125 धावांपर्यंत पोहचली, दरम्यान, पावसाला सुरूवात झाली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.