IPL 2023 : लाखाचं बक्षीस घेणाऱ्या खेळाडूने संजू भाऊची डोकेदुखी वाढवली

राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का! पुढच्या सामन्यातून बाहेर
IPL 2023 Jos Buttler
IPL 2023 Jos Buttler
Updated on

IPL 2023 Jos Buttler : बुधवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्सला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राजस्थानच्या क्रिकेट चाहत्यांचे टेन्शन वाढवणार आहे. या सामन्यादरम्यान राजस्थानचा स्टार खेळाडू जोस बटलर क्षेत्ररक्षणादरम्यान झेल घेताना जखमी झाला होता.

आता त्याच्या दुखापतीबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (८ एप्रिल) यांच्यातील सामन्यातून बटलर बाहेर राहणार असल्याचे बोलले जात आहे.

IPL 2023 Jos Buttler
IPL 2023: कोण आहे ध्रुव जुरेल? ज्यानं 197 धावा करणाऱ्या पंजाबला रडवलं...

पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात बटलरला शाहरुख खानचा झेल घेताना दुखापत झाली होती. त्यांच्या डाव्या हाताच्या वरच्या बोटाला दुखापत झाली आहे. दुखापत इतकी गंभीर होती की बटलरच्या करंगळीला अनेक टाके पडले. आता या दुखापतीमुळे तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आगामी सामन्यापासून दूर राहू शकतो. या दुखापतीमुळे बटलर पंजाब किंग्जविरुद्ध सलामीलाही आला नाही. बटलरच्या जागी आर अश्विनने राजस्थानच्या डावाची सुरुवात केली.

IPL 2023 Jos Buttler
IPL 2023: अश्विनने धवनला दिला मंकडिंगचा इशारा अन् बटलरच्या डोक्यात आल्या मुंग्या... व्हिडिओ व्हायरल

जोस बटलरच्या दुखापतीवर सामन्यानंतर वक्तव्य करताना संजू सॅमसन म्हणाला की, 'जोस फिट नाही. पडल्यानंतर त्याच्या बोटांना अनेक टाके पडले आहेत. त्याच वेळी जेव्हा बटलर सामन्यानंतर उत्कृष्ट झेलसाठी पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेला तेव्हा तो त्याच्या बोटांवर विशिष्ट पांढरा पट्टा घातलेला दिसला. उत्कृष्ट झेलसाठी त्याला लाखाचं बक्षीस मिळाले आहे.

राजस्थानचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे, अशा परिस्थितीत या सामन्यात बटलरची अनुपस्थिती राजस्थान रॉयल्सच्या अडचणी वाढवू शकते. राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना 8 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. उभय संघांमधील ही रोमांचक लढत फक्त गुवाहाटी येथील बसपारा स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.