Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुणतालिकेतील तळातील संघ सनराईजर्स हैदराबादने राजस्थानला पराभवाचा धक्का दिला. राजस्थानच्या 215 धावांचे आव्हान पार करताना हैदराबादने सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला होता. हैदराबादला विजयासाठी 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना संदीप शर्माने अब्दुल समादला झेलबाद केले. मात्र त्यानंतर लगचे नो बॉलचा सायरन वाजला. हा सायरन फक्त नो बॉलचा राहिला नाही तर तो राजस्थानच्या पराभवाचा भोंगा देखील ठरला. आधीच्या चेंडूवर मैदान सोडलेल्या अब्दुल समादने एका चेंडूत 4 धावांची गरज असताना षटकार मारतच हैदराबादला रोमहर्षक सामना जिंकून दिला.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध 20 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 214 धावा केल्या. राजस्थानकडून सलामीवीर जॉस बटलरने 95 धावांची खेळी केली तर संजू सॅमसनने 66 धावा ठोकत संघाला 200 पार पोहचवले. यशस्वी जैसवालनेही 18 चेंडूत 35 धावांची खेळी करत राजस्थानला चांगली सुरूवात करून दिली होती.
संजू सॅमसन आणि जॉस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. दरम्यान, बटलर आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता तर संजूने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. राजस्थानही 200 च्या जवळ पोहचला होता.
मात्र भुवनेश्वर कुमारने 95 धावांवर असलेल्या बटलरला पायचीत बाद केले. बटलरने 59 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारून ही खेळी सजवली. यानंतर संजूने 38 चेंडूत नाबाद 66 धावा ठोकत हेमटायरच्या साथीने 10 व्या षटकात राजस्थानला 200 च्या पार पोहचवले. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 214 धावा करत हैदराबादसमोर विजयासाठी 215 धावांचे मोठे आव्हान ठेवले.
यशस्वी बाद झाल्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने देखील आक्रमक फलंदाजी करण्यास सूरवात केली. त्याला जॉस बटलर बॉल टू रन करत साथ देत होता. या दोघांनी 9 षटकात राजस्थानला 95 धावा करून दिल्या. यानंतर जॉस बटलरने देखील आपला गिअर बदलत आक्रमक फटके मारण्यास सुरूवात केली.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानाची स्टार सलामीवीर जोडी यशस्वी जैसवाल आणि जॉस बटलर यांनी धडाकेबाज सुरूवात केली. या दोघांनी पाचव्या षटकातच राजस्थानचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को येनसेनने 18 चेंडूत 35 धावा ठोकणाऱ्या यशस्वी जैसवालला बाद केले.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट राजस्थान रॉयर्सकडून आयपीएल पदर्पण करणार.
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.