RCB IPL 2023: KKR विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCBला धक्का! धडाकेबाज बॅटर आयपीएलमधून बाहेर

RCB IPL 2023: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे.
 Rajat Patidar Ruled Out IPL 2023 | Cricket News in Marathi
Rajat Patidar Ruled Out IPL 2023 | Cricket News in Marathi
Updated on

Rajat Patidar Ruled Out IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. रजत पाटीदार गेल्या काही काळापासून त्याच्या टाचेच्या दुखापतीतून सावरत होता. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.

 Rajat Patidar Ruled Out IPL 2023 | Cricket News in Marathi
Sanjita Chanu Ban : कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन भारतीय वेटलिफ्टरवर बंदी, कारण ऐकून बसेल धक्का

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर रजत पाटीदारला आयपीएल 2023 मधून वगळल्याची माहिती दिली. रजत पाटीदारचा फोटो शेअर करताना आरसीबीने लिहिले की, दुर्दैवाने तो दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर आहे आणि आम्ही त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.

 Rajat Patidar Ruled Out IPL 2023 | Cricket News in Marathi
Sanjita Chanu Ban : कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन भारतीय वेटलिफ्टरवर बंदी, कारण ऐकून बसेल धक्का

रजत पाटीदारला आरसीबीने आयपीएलच्या शेवटच्या हंगामात बदली खेळाडू म्हणून सामील केले होते. त्याने IPL 2022 मध्ये 8 सामन्यांमध्ये सुमारे 153 च्या स्ट्राइक रेटने एकूण 333 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली. रजत पाटीदार बाहेर झाल्याने आरसीबीची फलंदाजी कमजोर दिसत आहे. मात्र पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव करत चालू हंगामाची धमाकेदार सुरुवात केली.

आरसीबीने अद्याप रजतच्या बदलीची घोषणा केलेली नाही. रजत पाटीदार आयपीएलच्या गेल्या मोसमात आरसीबीसाठी गेम चेंजर ठरला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()