Rashid Khan MI vs GT : मुंबईच्या विजयाला लागले राशिदचे गालबोट! दोन गुण मिळाले मात्र रनरेट अजून उणेच

Rashid Khan Mumbai Indians vs Gujarat Titans
Rashid Khan Mumbai Indians vs Gujarat Titans esakal
Updated on

Rashid Khan Mumbai Indians vs Gujarat Titans : मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेल्या 219 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची अवस्था 8 बाद 103 धाव झाली होती होती. मुंबई हा सामना किमान शंभर धावांनी जिंकणार असे वाटत होते. मात्र गुजरातच्या राशिद खानने झुंजारपणा काय असतो हे आजच्या सामन्यात दाखवले. त्याने एकट्याने 32 चेंडूत 79 धावा चोपल्या. अखेर मुंबईने सामना 27 धावांनी जिंकला मात्र मुंबईच्या विजयाला राशिदचे गालबोट लागलेच.

मुंबईने आजचा सामना 27 धावांनी जिंकून गुणतालिकेत 14 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. मात्र आजच्या सामन्यात मुंबईला त्यांचे रनरेट सुधारण्याची चांगली संधी होती. मात्र राशिद खानने मुंबईच्या मनसुब्यांवर 10 षटकार मारत पाणी फेरले. आता मुंबईचे रनरेट हे -0.117 आहे. हे रनरेट मुंबईला प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर देखील करू शकते. मुंबईचे अजून 2 सामने शिल्लक आहेत. दोन्ही सामने त्यांना जिंकावेच लागतील.

Rashid Khan Mumbai Indians vs Gujarat Titans
Suryakumar Yadav : सूर्याची चमक पाहून खुद्द क्रिकेटचा देवही भारावला... किंग कोहली म्हणाला भावा मानलं तुला!

मुंबई इंडियन्सचे 219 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातची पॉवर प्लेमध्येच 3 बाद 26 धावा अशी अवस्था झाली होती. आकाश माधवालने वृद्धीमान साहा आणि शुबमन गिलचा अडसर दूर केला होता. तर बेहरनडॉर्फने हार्दिक पांड्याला शांत केले. यानंतर विजय शंकर आणि डेव्हिड मिलर यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र पियुष चावलाने विजय शंकरचा 29 धावांवर त्रिफळा उडवला. तर 26 चेंडूत 41 धावा करत चांगली झुंज देणाऱ्या डेव्हिड मिलरला आकाश माधवालने बाद करत आपला तिसरा बळी टिपला. यानंतर पियुष चावला आणि कुमार कार्तिकेय या फिरकी जोडीने गुजरातची अवस्था 8 बाद 103 धावा अशी केली.

Rashid Khan Mumbai Indians vs Gujarat Titans
Yashasvi Jaiswal : यशस्वी जैसवालने एका दगडात दोन नाही.. तीन नाही... तर मारले तब्बल पाच पक्षी

आता मुंबई इंडियन्सच्या विजयाची औपचारिकताच राहिली होती. रोहित शर्मा देखील गुजरातला लवकरात लवकर गुंडळून आपले उणे रनरेट अधिक करण्याच्या तयारीत होता. मात्र राशिद खानला हे मान्य नव्हते. त्याने एकट्याने झुंज देण्यास सुरूवात केली. राशिदने मुंबईच्या गोलंदाजांना षटकार मारण्याचा सपाटाच लावला. त्याने पाठोपाठ 10 षटकार आणि 3 चौकार मारत बघता बघता 32 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. त्याने सामना एक षटक आणि 48 धावा असे आणले होते. सामना तसाही मुंबईने जिंकला मात्र तरी शेवटच्या षटकात राशिदने 3 षटकार मारत 20 धावा चोपल्याच. संपूर्ण सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र शेवटी राशिदने त्यांच्या या कामगिरीला षटकारांचे गालबोट लावलेच.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून वानखेडेवर मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यास भाग पाडले. मात्र मुंबईने दमदार सुरूवात करत गुजरातच्या रणनितीला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र राशिद खानने आपला जलवा दाखवत मुंबईला पाठोपाठ तीन धक्के दिले होते.

अखेर मुंबईचा सूर्या मैदानात आला आणि त्याने वानखेडे हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. त्याने एकहाती किल्ला लढवत 49 चेंडूत शतकी तडाखा दिला. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 20 षटकात 5 बाद 218 धावांपर्यंत पोहचवले. सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. सूर्याचे हे आयपीएलमधील पहिले शतक ठरले. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.