Ravi Shastri Virat Kohli : रवी शास्त्री एकदाच कंडका पाडणार! विराट - गंभीर वाद मिटणार?

Ravi Shastri Virat Kohli Gautam Gambhir Controversy
Ravi Shastri Virat Kohli Gautam Gambhir Controversyesakal
Updated on

Ravi Shastri Virat Kohli Gautam Gambhir Controversy : विराट कोहली आणि गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावं आहेत. मात्र या दोन मोठ्या नावांनी कालच्या (दि.2 मे) आयपीएलच्या लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात नाव मोठं लक्षण खोटं असं काम केलं. दोघेही भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च दर्जाचे क्रिकेटपटू असूनही गल्लीतील पोरांसारखे भांडले. यामुळे या दोघांविषयी आणि एकंदर भारतीय क्रिटेविषयी नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे हे वातावरण निवळण्याची शक्यताही दिसत नाहीये.

Ravi Shastri Virat Kohli Gautam Gambhir Controversy
GT vs DC : इशांत शर्माची दमदार गोलंदाजी, गुजरातला 130 धावांचे आव्हानही झेपले नाही

अशा परिस्थितीत भारताचे माजी प्रशिक्षक आणि विराट कोहली ज्यांचं ऐकतो असे रवी शास्त्री यांनी या दोघांमध्ये सेटलमेंट करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासाठी खुद्द रवी शास्त्री मध्यस्थी करण्यास देखील एका पायावर तयार आहेत. रवी शास्त्री स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की,

'मला वाटते की वातावरण एक दोन दिवसात निवळण्याची शक्यता आहे. त्यावेळी त्यांना समजेल की ही परिस्थिती अजून चांगल्या पद्धतीने हाताळता आली असती. दोन्ही खेळाडू एकाच राज्यातून येतात. एकाच राज्याकडून खेळले आहेत. गौतम तर दोन वर्ल्डकप जिंकलेल्या संघाचा भाग राहिला आहे. विराट तर आयकॉन आहे. दोघेही दिल्लीचे आहेत. मला वाटते की दोघांना एकत्र बसवावे आणि या विषयावर एकदा कायमचा कंडका पाडावा.'

Ravi Shastri Virat Kohli Gautam Gambhir Controversy
Virat Kohli Gautam Gambhir Controversy : गौतम गंभीर - विराट कोहली भिडले अन् राजकारण तापणार कर्नाटकातलं?

रवी शास्त्री यासाठी या दोघांमध्ये मध्यस्थाची देखील भुमिका बजावण्यास तयार आहेत. ते म्हणाले की, 'हे कोणीही करावं मात्र लवकरात लवकर केलेलं बरं. कारण आपण हे आता पुढं वाढवू देणं योग्य नाही. ते पुढच्या वेळी पुन्हा भेटले की पुन्हा बाचाबाची करणारच. त्यामुळे हे लवकर संपवलेलं बरं. जर मला हे करावं लागलं तर मी ते नक्की करेन.'

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.