नट्टूची टी 20 वर्ल्डकपमध्ये कमतरता जाणवली : रवी शास्त्री

Ravi Shastri Says We Miss T Natarajan in T20 World Cup
Ravi Shastri Says We Miss T Natarajan in T20 World CupEsakal
Updated on

मुंबई : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टी नटराजनच्या (T Natarajan) स्लॉग ओव्हरमधील गोलंदाजीबाबत (Slog Over) त्याचे कौतुक केले. त्यांनी भारताला युएईमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) नटराजनची कमतरता भासली. नटराजन पहिल्यांदा 2021 च्या कसोटी मालिकेत प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याला दुखापतीने ग्रासले. त्यामुळे तो भारताकडून फारसे सामने खेळू शकला नव्हता. आता त्याने आयपीएलच्या 15 व्या हंगामात सनराईजर्स हैदराबादकडून जोरदार पुनरागमन केले.

दरम्यान, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी नटराजनबद्दल एक मोठे वक्तव्य केले. इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले, 'मी नटराजनसाठी खूप आनंदी आहे. आम्ही त्याची वर्ल्डकपमध्ये उणीव जाणवली.' भारत युएईमधील वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेजलाच गारद झाला होता.

Ravi Shastri Says We Miss T Natarajan in T20 World Cup
IPL 2022 : युजी-देवदत्तवर 'धर्मसंकट'; जाफरला आठवलं 'महाभारत'

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, 'तो इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. तेथे आम्ही वनडे मालिका खेळत होतो. आम्ही त्याला वर्ल्डकपमध्ये मिस केले. तो एक स्लॉग ऑव्हरमधील स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. त्याचे यॉर्कर कौशल्यपूर्ण असतात. त्याचे त्यावर चांगले नियंत्रण आहे. त्याच्या चेंडू टप्पा पडल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने येतो.'

नटराजनने सनराईजर्सने 4 कोटी रूपये खर्चून संघात परत घेतले होते. त्याने 12 महिन्यानंतर दमदार कमबॅक केले. त्याने 26 धावात 2 बळी टिपले. मात्र तो सनराईजर्स हैदराबादचा सलग दुसरा पराभव टाळू शकला नाही. लखनौ सुपर जायंटने त्यांचा 12 धावांनी पराभव केला.

Ravi Shastri Says We Miss T Natarajan in T20 World Cup
IPL 2022 : धोनीच्या जीवावर कॅप्टन्सी मिरवू नको, जड्डूला सल्ला

नटराजनने ज्यावेळी 2020 - 21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण केले त्यावेळी रवी शास्त्री संघाचे प्रशिक्षक होते. नटराजन हा त्यांच्यासाठी लकी चार्म होता. त्याबद्दल शास्त्री म्हणाले, 'ज्या ज्या वेळी आम्ही त्याला संघात घेतले त्या त्या वेळी आम्ही सामना जिंकला आहे. त्याच्या टी 20 पदार्पणात आम्ही जिंकलो होते. त्याने कसोटीत पदार्पण केले, आम्ही जिंकलो. नेट बॉलर म्हणून आलेल्या नटराजनने भारताचे दोन क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()