CSK Won 5th IPL Title : जडेजा, रहाणे की रायडू...चेन्नईच्या विजयाचा हिरो कोण?

CSK Won 5th IPL Title
CSK Won 5th IPL Titleesakal
Updated on

CSK Won 5th IPL Title : चेन्नई सुपर किंग्जने असंख्य अडथळे पार करत अखेर आपल्या पाचव्या आयपीएल ट्रॉफीवर आपली मोहर उमटवली. चेन्नईने ज्या प्रकारे हंगामाची सुरूवात केली ते पाहता ते यंदा प्ले ऑफ तरी गाठणार का अशी शंका वाटत होती. मात्र चेन्नईने गुजरात पाठोपाठ प्ले ऑफमध्ये प्रवेश केला अन् बघता बघता विजेतेपदाला गवसणी घातली.

पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातला पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलेल्या चेन्नईला फायनल जिंकण्यासाठी मात्र दोन दिवसांची वाट पहावी लागली. पहिला दिवस पावसाने वाया गेला राखीव दिवशी सामना गेला अन् सर्वांना धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आठवला.

त्यात राखीव दिवशी देखील सामन्यात पावसाने चेन्नईची डोकेदुखी वाढवली. चेन्नईला 15 षटकात 171 धावांचे अत्यंत कठिण असे आव्हान मिळाले. मात्र चेन्नई हा धोनीचा संघ आहे. तो शेवटच्या चेंडूवर चमत्कार घडवण्यात माहीर आहे.

चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत सामना जिंकून दिला. मात्र चेन्नईच्या या विजयाची इतकीच व्याख्या होत नाही. चेन्नईच्या या दिमाखदार विजयासाठी सीएसकेचा प्रत्येक खेळाडू झटला.

सलामीला ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेने 4 षटकात 52 धावा करत पॉवर प्लेमध्ये संघाला योग्य ट्रॅकवर ठेवले. ऋतुराज 26 धावा करून बाद झाला. मात्र कॉन्वेने 47 धावांची खेळी करत संघाला शतकी मजल मारून दिली. शिवम दुबेने 21 चेंडूत 32 धावा करत चेन्नईसाठी धावा आणि षटकांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणेने क्लासिकल मात्र 207 च्या स्ट्राईक रेटने 13 चेंडूत 27 धावा ठोकल्या. यात दोन षटकार आणि दोन चौकार मारले. नंतर आला तो आपला शेवटचा आयपीएल सामना खेळणारा अंबाती रायुडू!

त्याने तर गुजरातचा खेळण्यास सर्वात अवघ गोलंदाज मोहित शर्माची बॉलिंग फिगर बिघडवली. 8 चेंडूत 19 धावा चोपत त्याने चेन्नईसाठी सामना आवाक्यात आणला. मात्र रायडूला सामना फिनिश करू शकलो नाही याची खंत असणार.

रायडूचे हे अधुरे काम रविंद्र जडेजाने केले. धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यावर चेन्नई फॅन्सला पराभवाची भिती वाटू लागली होती. मात्र जडेजाने मैं हू ना म्हणत सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असताना मोहित शर्माला एक षटकार आणि एक चौकार मारत चेन्नईचे पाचव्या विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण केले. विशेष म्हणजे या फेजमध्ये शिवम दुबेला मोठे फटके मारण्यात अपयश आले. तरी देखील तो टिकून राहिला अन् दुहेरी धावा घेण्यावर त्याने भर दिला.

अशा प्रकारे चेन्नईच्या विजयाचा हिरो चेन्नईची सगळी पोरंच ठरली!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.