Ravindra Jadeja CSK vs GT : चेन्नईचा नाराज माजी कर्णधार रविंद्र जेडजाने अखेर आपली किंमत दाखवून दिली. चेन्नईला 2 चेंडूत 10 धावांची गरज असताना मोहित शर्मासारख्या कसलेल्या गोलंदाजाला एक षटकार आणि एक चौकार मारत चेन्नईला त्यांचे पाचवे विजेतेपद जिंकून दिले.
पावसामुळे चेन्नईसमोर विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान होते. चेन्नईने हे आव्हान 15 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. चेन्नईकडून सर्वच फलंदाजांनी योगदान दिले. कॉन्वेने 47 धावांची दमदार खेळी केली. तर रविंद्र जडेजाने 6 चेंडूत 15 धावा ठोकत चेन्नईचा विजय साकार केला.
गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या 96 आणि वृद्धीमान साहाच्या 54 धावांच्या जोरावर चेन्नईसमोर विजयासाठी 215 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र चेन्नईची फलंदाजी सुरू होण्यापूर्वीच पावसाने फलंदाजी सुरू केल्याने सामना थांबला अखेर सामना सुरू झाला त्यावेळी चेन्नईला 15 षटकात 171 धावांचे नवे टार्गेट देण्यात आले.
पावसामुळे सामना 15 षटकांचा झाल्यानंतर चेन्नईसमोर 171 धावांचे टार्गेट आले. चेन्नईचे सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाडने 4 षटकाच्या पॉवर प्लेमध्ये 52 धावा ठोकत चांगली सुरूवात केली. मात्र पाचव्या षटकात नूर अहमदने फक्त 6 धावा देत चेन्नईवर दबाव वाढवला.
पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात केल्यानंतर नूर अहमदने चेन्नईच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्याने सातव्या षटकात 26 धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला अन् 47 धावा करणाऱ्या डेवॉन कॉन्वेला बाद केले. यामुळे धावांची गती वाढू लागली. मात्र अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी चेन्नईला 8 षटकात 94 धावांपर्यंत पोहचवले.
अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी चेन्नईला 10 षटकात 112 धावांपर्यंत पोहचवले. त्यामुळे आता चेन्नईसमोर 30 चेंडूत 59 धावा करण्याचे टार्गेट होते. मात्र मोहित शर्माने 13 चेंडूत 27 धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणाले बाद केले. मात्र पुढच्याच 12 व्या षटकात शिवम दुबेने राशिद खानला 15 धावा चोपल्या.
चेन्नईला आता 18 चेंडूत विजयासाठी 38 धावांची गरज होती. आपला शेवटचा आयपीएल सामना खेळणाऱ्या अंबाती रायडूने मोहित शर्माच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. यामुळे सामना 16 चेंडूत 28 धावा असा आला. तिसऱ्या चेंडूवर रायडूने अजून एक षटकार मारत सामना 14 चेंडूत 22 धावा असा आणला. मात्र रायडू पुढेच्याच चेंडूवर झेलबाद झाला.
रायडू बाद झाल्यानंतर चेन्नईला सामना जिंकण्यासाठी 14 चेंडूत 22 धावांची गरज होती. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी क्रिजवर आला. मात्र पहिल्याच चेंडूवर मोहितने धोनीला बाद केले. हा चेन्नईसाठी मोठा धक्का होता. मोहितने आपल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव दिले. आता सामना 12 चेंडूत 21 धावा असा आला.
19 वे षटक टाकणाऱ्या मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर एक धाव दिली. पुढचा चेंडू निर्धाव टाकला मात्र तिसऱ्या चेंडूवर शिवम दुबेने 2 धावा केल्या. आता सामना 9 चेंडूत 18 धावा असा आला होता. दुबेने दोन धावा घेत सामना 8 चेंडूत 16 धावा असा आणला. षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर शमीने तीन धावा दिल्या.
आता चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती. शेवटचे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्याने चेंडू मोहित शर्माच्या हातात चेंडू दिला. स्ट्राईकवर दुबे होता. मोहित शर्माने
पहिला चेंडू यॉर्कर टाकला त्यावर एकही धाव झाली नाही.
- सामना 5 चेंडूत 13 धावा असा आला होता. दुसऱ्या चेंडूवर मोहितने एक धाव दिली.
- आता चेन्नईला 4 चेंडूत 12 धावा असा आला. स्ट्राईकवर असलेल्या जडेजाने 1 धाव केली.
- सामना 3 चेंडू 11 धावा असा आला. शिवम दुबेने 1 धाव केली.
- आता चेन्नईला विजयासाठी 2 चेंडूत 10 धावांची गरज होती.
- जडेजाने मोहितला पाचव्या चेंडूवर षटकार मारत सामना 1 चेंडूत 4 धावा असा आणला.
- शेवटच्या चेंडूवर जडेजाने चौकार मारत चेन्नईला पाचवे विजेतेपद जिंकून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.