दुबे नाही तर 'हे' आहे CSK च्या पराभवाचे कारण; कर्णधाराचा खुलासा

CSK Captain Ravindra Jadeja
CSK Captain Ravindra Jadeja esakal
Updated on

लखनौ सुपर जायंटने चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) 211 धावांचे आव्हान पार करत आयपीएलच्या (IPL 2022) हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जने 210 धावा करुन देखील त्यांना पराभवचा सामना करावा लागला. चेन्नईच्या या पराभवाचे विश्लेषण अनेक तज्ज्ञ करत आहेत. मात्र संघाचा कर्णधार रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सीएसके का हरली याचे कारण सांगितले.

CSK Captain Ravindra Jadeja
IPL 2022 : कैफने केकेआरवर कुलदीपच्या खच्चीकरणावरून केले गंभीर आरोप

चेन्नईच्या पराभवावर रविंद्र जडेजा म्हणाला की, 'आम्हाला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. आम्ही केएल राहुल आणि क्विंटन डिकॉकचे कॅच (Drop Catches) सोडले.' जडेजा पुढे म्हणाला की, आमची सुरुवात चांगली झाली होती. मात्र आम्ही त्यांना संधीचा फायदा उठवू दिला. आज मैदानावर खूप दव पडले होते. चेंडू हातात येतच नव्हता. आता आम्हाला ओल्या चेंडूवर सराव करावा लागणार आहे.'

CSK Captain Ravindra Jadeja
VIDEO : डग आउटमधील गंभीरच्या तेवरनं चाहते क्लिन बोल्ड

दरम्यान, विजेत्या लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) सामन्यानंतर म्हणाला की, 'रवी बिश्नोईने चांगली उर्जा दाखवली. गेल्या सामन्यातील खराब कामगिरीनंतर त्याने चेंडू ओला झाल्यानंतरही दमदार पुनरागमन केले. मी यापूर्वी बडोनीचे काही व्हिडिओ पाहिले होते. त्यात तुम्हाला फक्त चांगले शॉट दिसून येतील. त्याने चांगली फलंदाजी केली. तो एक 360 डिग्री खेळाडू आहे. भारताला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हा एक जबरदस्त खेळाडू मिळाला आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()