IPL जिंकून देणाऱ्या पतीसाठी आमदार पत्नी इमोशनल ! डोळ्यात अश्रु मैदानातचं मारली मिठी

चेन्नईचा नाराज माजी कर्णधार रविंद्र जेडजाने अखेर आपली किंमत दाखवून दिली.
Ravindra Jadeja shares emotional moment with his wife Rivaba Jadeja as CSK win IPL 2023
Ravindra Jadeja shares emotional moment with his wife Rivaba Jadeja as CSK win IPL 2023
Updated on

IPL Final Match best moments 2023: चेन्नईचा नाराज माजी कर्णधार रविंद्र जेडजाने अखेर आपली किंमत दाखवून दिली. चेन्नईला 2 चेंडूत 10 धावांची गरज असताना मोहित शर्मासारख्या कसलेल्या गोलंदाजाला एक षटकार आणि एक चौकार मारत चेन्नईला त्यांचे पाचवे विजेतेपद जिंकून दिले.

तर दुसरीकडे पत्नी रिवाबाच्या डोळ्यात पाणी आले. मैदानात थेट धाव घेत जेडजाला मिठी मारली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Ravindra Jadeja shares emotional moment with his wife Rivaba Jadeja as CSK win IPL 2023 )

जडेजाने मोहित शर्माच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईच्या विजयानंतर जडेजा मैदानातून डगआऊटमध्ये बसलेल्या महेंद्र सिंह धोनीकडे धावला. त्याने धोनीला मिठी मारली. त्यावेळी धोनीने त्याला उचलले.

यानंतर जडेजाची पत्नी रिवाबा मैदानात उतरली. रिवाबाने जडेजाला मिठी मारली. या भावूक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ravindra Jadeja shares emotional moment with his wife Rivaba Jadeja as CSK win IPL 2023
Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडची बायको दिसते तरी कशी? फोटो व्हायरल

तसेच रिवाबाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती शेवटच्या क्षणी आपला श्वास रोखून बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रु तरळले होते. चौकार मारताच तिनं सुटकेचा श्वास सोडला.

Ravindra Jadeja shares emotional moment with his wife Rivaba Jadeja as CSK win IPL 2023
Gud बाय लिजंड! CSKच्या दिग्गज खेळाडूने भरल्या डोळ्यांनी केला क्रिकेटला अलविदा

पावसामुळे चेन्नईसमोर विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान होते. चेन्नईने हे आव्हान 15 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. चेन्नईकडून सर्वच फलंदाजांनी योगदान दिले. कॉन्वेने 47 धावांची दमदार खेळी केली. तर रविंद्र जडेजाने 6 चेंडूत 15 धावा ठोकत चेन्नईचा विजय साकार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.