Jadeja MS Dhoni: धोनी जडेजाचे भांडण...या टीमला होणार मोठा फायदा

धोनीसोबत फाटल्याची चर्चा
 Jadeja MS Dhoni
Jadeja MS Dhoni
Updated on

रविवारी रात्रीपासून चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू आणि फ्युचर कॅप्टन संबोधल्या जाणारा रविंद्र जडेजा अचानक चर्चेत आला. चेन्नईचा कॅप्टन धोनी आणि जडेजा या दोघांच्या मैत्रीत मीठाचा खडा पडल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता या दोघांच्या भांडणाचा फायदा विराट कोहलीची टीम घेणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. इतकेच नव्हे तर Come to RCB असा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे. (Ravindra Jadeja Upstox Tweet Viral fans demand join rcb )

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने हा सामना 15 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर जडेजाला Upstox Most Valuable player of the match या पुरस्काराने गौरवण्यात आले.

त्यानंतर जडेजाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पुरस्कार स्विकरात असलेला फोटो शेअर केला. यावेळी त्यांने खोचक कॅप्शन देत पुन्हा सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'Upstox knows but..some fans don’t ' अशी खोचक कॅप्शन दिली आहे. त्याच्या या ट्विटनंतर चाहते त्याला रिट्विट करत आरसीबी संघात येण्याची मागणी करत आहेत. #CometoRCB सध्या ट्रेंड करत आहे.

जडेजाने गुजरातविरुद्ध 16 चेंडूत 22 धावांची खेळी खेळली आणि गोलंदाजीत 4 षटकात 18 धावा देत 2 बळीही घेतले.

 Jadeja MS Dhoni
Ravindra Jadeja MS Dhoni Controversy : धोनीसोबत फाटल्याची चर्चा; त्यात जडेजा पती - पत्नींचा ते ट्विट...
 Jadeja MS Dhoni
Ravindra Jadeja IPL 2023: 'माही भाईमुळे माझ्या आऊट होण्यासाठी...' CSK चाहत्यांवर रवींद्र जडेजाचा मोठा आरोप

चेन्नईने रेकॉर्ड 12 व्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला अन् धोनीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चेन्नई यंदाच्या हंगामातील प्ले ऑफसाठी पात्र होणारी दुसरी टीम ठरली. चेन्नईच सर्व खेळाडू आणि चाहते जल्लोष करत असताना धोनी आणि रविंद्र जडेजाचे मात्र काही वेगळेच सुरू होते.

या दोघांच्या देहबोलीवरून ते दोघेही एकमेकावर नाराज असल्याचे दिसत होते. काही चाहत्यांच्या मते जडेजाने 4 षटकात 50 धावा दिल्याने धोनी जडेजाला ओरडत होता. तर काही चाहते हे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हणत आहेत.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर जडेजाने रविवारी एक ट्विट करून खळबळ उडवली. त्याने 'तुमचे कर्म फिरून तुमच्यापर्यंत येतात. आता नाही तरी काही काळाने मात्र यातात नक्की.' असा मजकूर लिहिलेला टेम्पेलट शेअर केला. त्याला नक्कीच असे कॅप्शनही दिले होते. त्यानंतर थम्स अपचा इमोजी देखील लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.