Ravindra Jadeja MS Dhoni Controversy : रविवारी रात्रीपासून चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू आणि फ्युचर कॅप्टन संबोधल्या जाणारा रविंद्र जडेजा अचानक चर्चेत आला. शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा 77 धावांनी पराभव करत आरामात प्ले ऑफ गाठली.
मात्र याचवेळी धोनी आणि रविंद्र जडेजा यांच्यामध्ये गरमागरमी झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. यानंतर रविंद्र जडेजाने एक क्रिप्टिक ट्विट केले. या ट्विटचा अर्थ काय याचा विचार करून सीएसकेच्या फॅन्सचे डोकं चक्रावलं असेल. रविंद्र जडेजाच्या ट्विटची चर्चा थंड होते ना होते तोच त्याची पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जडेजानेही एक ट्विट करत गोंधळात गोंधळ वाढवला.
चेन्नईने रेकॉर्ड 12 व्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला अन् धोनीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चेन्नई यंदाच्या हंगामातील प्ले ऑफसाठी पात्र होणारी दुसरी टीम ठरली. चेन्नईच सर्व खेळाडू आणि चाहते जल्लोष करत असताना धोनी आणि रविंद्र जडेजाचे मात्र काही वेगळेच सुरू होते. या दोघांच्या देहबोलीवरून ते दोघेही एकमेकावर नाराज असल्याचे दिसत होते. काही चाहत्यांच्या मते जडेजाने 4 षटकात 50 धावा दिल्याने धोनी जडेजाला ओरडत होता. तर काही चाहते हे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हणत आहेत.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन काही काळच उलटला होता तोपर्यंत जडेजाने रविवारी एक ट्विट करून खळबळ उडवली. त्याने 'तुमचे कर्म फिरून तुमच्यापर्यंत येतात. आता नाही तरी काही काळाने मात्र यातात नक्की.' असा मजकूर लिहिलेला टेम्पेलट शेअर केला. त्याला नक्कीच असे कॅप्शनही दिले होते. त्यानंतर थम्स अपचा इमोजी देखील लावला होता.
यानंतर हेच ट्विट रिट्विट करत जडेजाची पत्नी रिवाबाने त्याला कॅप्शन दिले की 'तू तुझ्या मार्गावर चालत रहा' या जडेजा पती पत्नींच्या ट्विटमुळे चेन्नईच्या कॅम्पमध्ये सगळं ठिक आहे की नाही याबाबत सभ्रमावस्था निर्माण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आज प्ले ऑफमधील पहिल्या क्वालिफायन सामन्यात गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. गुजरात सारख्या तगड्या संघाशी भिडताना सीएसकेचे सर्व खेळाडू एकदिलाने खेळणे गरजेचे आहे. मात्र सोशल मीडियावरील या पोस्टमुळे कुछ तो गडबड है! अशी शंका येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.