MI vs RCB IPL 2024 Will Jacks : रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा यंदाचा हंगाम देखील फारसा चांगला गेलेला नाही. त्यांचा विराट कोहली सोडला तर इतर एकही फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. विराट कोहली देखील ज्या स्ट्राईक रेटने धावा करतोय ते स्ट्राईक रेट सध्याच्या टी 20 फॉरमॅटमध्ये ओल्ड फॅशन ठरत आहे.
आशा परिस्थितीत आरसीबीकडे एक असा फलंदाज आहे ज्याचं स्ट्राईक रेट आणि टी 20 क्रिकेटचा अनुभव देखील दांडगा आहे. मात्र आरसीबीने असा खेळाडू बेंचवर बसवून ठेवला आहे. ही सगळी चर्चा होत आहे ती विल जॅक बद्दल! या अष्टपैलू खेळाडूला आरसीबीनं अजून संधी दिलेली नाही. तो ग्लेन मॅक्सवेल किंवा कॅमरोन ग्रीनची रिप्लेसमेंट आहे.
विल जॅकने टी 20 क्रिकेटमध्ये 158.66 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याच्याकडे टी 20 क्रिकेटमध्ये 4130 धावा करण्याचा अनुभव आहे. तो अष्टपैलू खेळाडू असल्याने तो गोलंदाजीतही चांगले योगदान देऊ शकतो.
विल जॅक हा त्याच्या उत्तुंग षटकारांसाठी प्रसिद्ध आहे. आरसीबीमधील अनेक फलंदाजांच्या तुलनेत त्याचे स्ट्राईक रेट हे उत्तम आहे. सध्याच्या टी 20 क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटला चांगलंच महत्व प्राप्त झालं आहे.
आरसीबीची सलामी जोडी यंदाच्या हंगामात आपली जादू दाखवू शकलेली नाही. फाफ ड्युप्लेसिस सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे तर विराट कोहली ज्या स्ट्राईक रेटने धावा करतोय त्याचा फायदा संघाला होताना दिसत नाहीये.
ड्युप्लेसिसने आतापर्यंत हंगामात फक्त 109 धावा केल्या आहेत. त्याचं टी 20 क्रिकेटमधील स्ट्राईक रेट हे 133.67 इकते आहे.
विराट कोहलीने यंदाच्या हंगामात धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र स्टाईक रेटच्या बाबतीत तोही मार खाताना दिसतोय. सध्या डोक्यावर ऑरेंज कॅप असलेल्या विराट कोहलीने आयपीएल इतिहासातील सर्वात संथ शतक ठोकलं आहे. त्याचं टी 20 क्रिकेटमधील स्ट्राआक रेट हे ड्युप्लेसिस सारखंच 133.73 इतकं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.