RCB On Hardik Pandya : रॉयल चॅलेंजर बेंगलोरचं 'लॉयल्टी ही रॉयलटी' कॅम्पॅन की MI अन् हार्दिकला चिमटा?

RCB On Hardik Pandya
RCB On Hardik Pandyaesakal
Updated on

RCB On Hardik Pandya : मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल विजेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवलं अन् गुजरात टायटन्समधून ट्रेड करून आणलेल्या हार्दिक पांड्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली. यानंतर चाहत्यांपासून क्रिकेट जाणकारांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावर आता आयपीएलच्या दुसऱ्या फ्रेंचायजींनीही प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.

RCB On Hardik Pandya
SA vs IND 1st ODI Playing 11 : नव्या मॅच फिनिशरचं पदार्पण पक्के मात्र चहल - कुलदीपमध्ये स्थानासाठी असेल चुरस

चेन्नई सुपर किंग्जने रोहितसाठी ट्विट केलं तर आरसीबीने आपल्या कॅम्पेनमधून हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सला चिमटा काढला. आरसीबीने नव्या कपड्यांचे कॅम्पेन सुरू केलं आहे. याला लॉयल्टी ही रॉयल्टी असे कॅप्शन दिलं आहे.

RCB On Hardik Pandya
SA vs IND 1st ODI Playing 11 : नव्या मॅच फिनिशरचं पदार्पण पक्के मात्र चहल - कुलदीपमध्ये स्थानासाठी असेल चुरस

भारताला वनडे वर्ल्डकपमध्ये फायनलपर्यंत घेऊन गेलेल्या रोहित शर्मासाठी 2023 हे वर्ष हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेणारं ठरलं आहे. WTC ची फायनल हरली, वनडे वर्ल्डकप जिंकता आला नाही तसेच मुंबईला प्ले ऑफमध्ये घेऊन गेला मात्र विजेतेपद पटकावता आलं नाही. आता मुंबई इंडियन्सने त्याच्याकडून कर्णधारपदही काढून घेतलं आहे.

दोन वर्षापूर्वी कॅप्टन्सीच्या मुद्द्यावरूनच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडून गेला होता अशी चर्चा आहे. आता तो कॅप्टन म्हणूनच मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. 15 डिसेंबरला मुंबई इंडियन्सने याची घोषणा केली.

RCB On Hardik Pandya
KL Rahul : मला आनंदच होईल... केएल राहुलच्या एका वक्तव्यानं ऋषभ पंतची झोप उडवली

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने रिटेंशन लिस्ट सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या तासात हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड ऑफ करून आपल्या गोटात खेचलं. यासाठी त्यांनी कॅमेरून ग्रीनला आरसीबीला ट्रेड ऑफ केलं अन् पैसा उभा केला.

गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणारा हार्दिक मुंबईत आल्यानंतरच रोहितची कर्णधारपदावरून उचलबांगडी होणार अशी चर्चा सुरू होती. अखेर या चर्चेला 15 डिसेंबरला मूर्त रूप आलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.