RCB Qualification Scenario IPL 2024 : सुरुवातीपासून गुणतालिकेच्या शर्यतीत तळाशी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. बंगळुरूला पहिल्या 8 पैकी 7 सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर आरसीबीने जो चमत्कार केला तो विश्वास बसण्यापलीकडे आहे. बेंगळुरूने या हंगामात सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे.
आयपीएल 2024 च्या 62 व्या सामन्यात बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. या विजयासह बेंगळुरूने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. आता बंगळुरूची लढत चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. हा सामना प्लेऑफसाठी निर्णायक ठरणार आहे. चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील हा सामना जो जिंकेल तो प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. पण इथेही एक ट्विस्ट आहे तो म्हणजे नेट रन रेट.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा वाईट आहे. बेंगळुरूने या हंगामात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. बेंगळुरूचा नेट रन रेट +0.387 आहे.
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सनेही या हंगामात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 7 सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. चेन्नईचा नेट रन रेट +0.528 आहे.
अशा परिस्थितीत 18 मे रोजी करोडो चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. विशेष म्हणजे फक्त हा सामना जिंकून बेंगळुरू पात्रता मिळवू शकणार नाही, कारण पुढचा सामना जरी बेंगळुरूने जिंकला तरी फक्त 7 सामने जिंकता येणार आहे. अशा परिस्थितीत आरसीबीला नेट रन रेटचीही काळजी घ्यावी लागेल.
दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्याविरुद्धचे सामनेही आरसीबीसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. या दोन्ही संघांचे 2-2 सामने बाकी आहेत आणि हे दोन्ही संघ अजूनही 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत आरसीबीला आशा करावी लागेल की यापैकी एक संघ आपला एक सामना गमावेल, जेणेकरून त्याचे फक्त 14 गुण राहतील. लखनौचा नेट रन रेट खूपच खराब असला तरी लखनौने 2 पैकी 1 सामना गमावला तर आरसीबीचा मार्ग सुकर होईल.
जर बेंगळुरूला प्लेऑफसाठी पात्र व्हायचे असेल तर चेन्नईचा मोठा पराभव करावा लागेल हे तुम्हाला समजले असेल. पण हा विजय किती मोठा आहे असा प्रश्न पडतो. या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करून चेन्नईला 180 धावांचे लक्ष्य दिले तर आरसीबीला 18 धावांनी विजय मिळवावा लागेल.
दुसरीकडे, जर आरसीबीने पाठलाग केला तर 180 धावांचे लक्ष्य 18.1 षटकांत पार करावे लागेल. आरसीबीने चेन्नईला या फरकाने हरवले तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरेल. अशा परिस्थितीत, आरसीबी चेन्नईविरुद्ध सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.